Cheapest Destination:- आज 2023 चा शेवटचा दिवस असून उद्यापासून 2024 या नवीन वर्षाची सुरुवात होणारी आहे. या नवीन नवीन वर्षाची सुरुवात बरेच व्यक्ती हे वेगळ्या पद्धतीने करतात. नवीन वर्षाचा जल्लोष हा अविस्मरणीय राहावा याकरिता काहीजण निसर्ग सौंदर्याने व्यापलेल्या आणि सुंदर अशा पर्यटन स्थळांना भेटी देतात.
तर काही जण आध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून धार्मिक पर्यटन स्थळांना देखील भेटी देतात. खास करून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पाहिले तर गोव्यासारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात. परंतु जेव्हा आपण अशा सहलीचे किंवा फिरायला जायचे नियोजन करतो. त्यावेळी आपण आपला आर्थिक बजेट देखील पाहत असतो.
कारण बाहेर फिरायला जाणे म्हणजे तुमचा राहण्यापासून तर प्रवास आणि खाण्यापर्यंतचा खर्च बऱ्याचदा खूप मोठ्या प्रमाणावर येतो. त्यामुळे बरेच जण कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या स्थळांना भेटी देण्याची प्लॅनिंग करत असतात. अशा व्यक्तींसाठी आपण या लेखामध्ये अशी काही ठिकाणांबद्दल माहिती देणार आहोत जी फक्त तुम्ही पाच हजार रुपयांमध्ये आरामात फिरून पिकनिक एन्जॉय करू शकतात.
भारतातील सर्वात स्वस्त पर्यटन स्थळे
1- मॅक्लोडगंज( हिमाचल प्रदेश)- हे ठिकाण हिमाचल प्रदेश राज्यांमध्ये असून त्या ठिकाणच्या एक अतिशय सुंदर व निसर्गाने परिपूर्ण असे ठिकाण आहे. हिमाचल मधील धर्मशालेजवळ असलेले ठिकाण प्रसिद्ध हिल स्टेशन असून जे ट्रेकर्सना खूप मोठ्या प्रमाणावर आवडते. या ठिकाणी असलेली तिबेटी संस्कृती अप्रतिम अशी आहे. भारतातील प्रसिद्ध नामग्याल मठ आणि त्सुगलाखांग या ठिकाणी असून हे ठिकाण खूपच स्वस्त आहे.
2- कसोल( हिमाचल प्रदेश)- तुम्हाला जर निसर्गरम्य परिसर जास्त आवडत असेल तर तुम्ही हिमाचल प्रदेश मधील कसोल या ठिकाणी भेट देऊ शकतात. कसोलला गेल्यावर तुम्ही त्या ठिकाणी पार्वती व्हॅलीचा आनंद घेऊ शकतात तसेच कसोल ते कुल्लू त्यानंतर 40 किलोमीटर आहे. तुम्ही दिल्ली येथून कसोलला व्हाल्हो बसने देखील जाऊ शकतात. ज्याचे भाडे तुम्हाला एक हजार रुपये लागेल. कसोल ला गेल्यानंतर तुम्ही अवघ्या पाचशे रुपयात हॉटेलची रूम बुक करू शकता आणि कमी बजेटमध्ये त्या ठिकाणी जेवण देखील मिळते.
3- पंचमढी( मध्य प्रदेश )- मध्यप्रदेश राज्यातील होशंगाबाद जिल्ह्यात पंचमढी हे एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य स्टेशन असून अवघ्या पाच हजार रुपयांमध्ये या ठिकाणी तुम्ही आरामात टूर आयोजित करू शकतात. पंचमढीला धबधबे तसेच अप्रतिम निसर्गसौंदर्य, गुहा आणि जंगल इत्यादींना भेट देऊ शकता व त्यासोबतच अनेक ऐतिहासिक वास्तु पाहण्याची देखील संधी मिळते. पंचमढीला तुम्हाला पाचशे रुपयांमध्ये हॉटेलची रूम आणि स्वस्तात जेवण मिळू शकते. फिरण्यासाठी जर तुम्ही भाड्याने जिप्सी घेतली तर तुम्हाला ती बाराशे रुपये पर्यंत मिळते.
4- लॅन्सडाऊन( उत्तराखंड)- लेंसडाऊन हे ठिकाण उत्तराखंडाच्या गडवाल टेकड्यांवर वसलेले असून पर्यटकांचे एक आवडते ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. शहरांचा गजबजाट आणि गर्दी पासून दूर पर्वतांच्या रांगेमध्ये शांतता आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल तर हे ठिकाण खूप महत्त्वपूर्ण ठरते. या ठिकाणी तुम्हाला चांगल्या हॉटेलमध्ये 700 ते 800 रुपयांमध्ये रूम मिळतो.
5- तवांग( अरुणाचल प्रदेश)- अरुणाचल प्रदेश राज्यातील तवांगला भेट देणेदेखील एक अविस्मरणीय असा प्रसंग ठरतो. या ठिकाणी दलाई लामा यांचा जन्म झालेला आहे व अनेक सुंदर असे मठ या ठिकाणी आहेत. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे ठिकाण महत्त्वाचे आहेच परंतु निसर्ग सौंदर्याच्या दृष्टिकोनातून देखील हे पर्यटन स्थळ तितकेच महत्त्वाचे आहे.
या ठिकाणी असलेले ऑर्किड अभयारण्य आणि टीपी ऑर्किड अभयारण्य अतिशय सुंदर असून तुम्हाला जर जायचे असेल तर दिल्लीहून ट्रेनने या ठिकाणी तुम्ही जाऊ शकतात. या ठिकाणी देखील स्वस्तात हॉटेल तुम्हाला मिळतात व जेवण देखील कमीत कमी बजेटमध्ये या ठिकाणी मिळते.
अशा पद्धतीने तुम्ही कमीत कमी खर्चात या पर्यटन स्थळांना भेट देऊ शकतात व तुमचा आनंद द्विगुणीत करू शकतात.