Highest Railway Bridge:- भारताची ओळख मुळात जगामध्ये जर पाहिली तर विविधतेत एकता असलेला देश अशी आहे. भारतामध्ये निसर्ग संपदा, भारताची भौगोलिक परिस्थिती, लोक संस्कृती तसेच लोक परंपरा इत्यादी अनेक बाबतीत विविधता दिसून येते.
अगदी त्याच पद्धतीने जर आपण रस्ते किंवा रेल्वे प्रकल्पांच्या दृष्टिकोनातून बघितले तर उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून जगात नव्हे अशा विविध प्रकारचे रस्ते किंवा बोगदे तसेच रेल्वे पूल उभारले जात आहेत. भारतामध्ये अशा निसर्गसंपदांचा आधार घेत व त्याला तंत्रज्ञानाची जोड देत संपूर्ण जगात नाहीत अशा गोष्टी उभारल्या जात आहेत.
अगदी याच मुद्द्याला धरून जर बघितले तर जगातील सर्वात उंच रेल्वेचा पूल देखील आता भारतात असून त्या पुलाला चीनाब रेल्वे पूल असे म्हटले जाते व नुकताच या रेल्वे पुलाची झलक देशाचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वर शेअर केली आहे.
हा एक केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक प्रकल्प असून या माध्यमातून जम्मू आणि काश्मीरला जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम पूर्ण करण्यात आलेले आहे. याच चिनाब रेल्वे पुलाविषयीची माहिती आपण या लेखात करून घेऊ.
चिनाब रेल्वे पूल आहे जगातील सर्वात उंच रेल्वे पूल
भारतामध्ये जगातील सर्वात उंचीचा रेल्वेचा पुल उभारण्यात आला असून त्याचे नाव चिनाब रेल्वे पूल असे आहे. नुकतेच देशाचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या रेल्वे पुलाची एक अनोखी झलक अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केलेली आहे.
हा पूल जम्मूचा रियासी जिल्ह्यामध्ये असून जम्मू आणि काश्मीरला जोडण्यासाठी एक महत्त्वपूर्ण असा पूल आहे. या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे हा पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा देखील उंच पूल असून भारतीय रेल्वेतील हा एक नावीन्यपूर्ण प्रकल्प म्हणून देखील ओळखला जात आहे.
विशेष म्हणजे जर आपण जम्मू आणि काश्मीर या ठिकाणाची नैसर्गिक परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी कायम जोरदार वारा तसेच भूस्खलनाचा धोका कायम असतो. परंतु तरी देखील अशा ठिकाणी हा उंच पूल उभारण्यात आलेला आहे. या पुलाला इंजिनिअरिंगचा चमत्कार म्हणजेच अभियांत्रिकी चमत्कार म्हणून देखील ओळख मिळाली आहे.
चिनाब रेल्वे पुलाची वैशिष्ट्ये
हा पूल भूकंप प्रतिरोधक असून जगातील सर्वात उंच सिंगल कमान असलेला रेल्वे पूल आहे. जम्मू येथील रियासी जिल्ह्यातील चिनाब नदीवर या पुलाची निर्मिती करण्यात आलेली असून या पुलासाठी 14000 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
या पुलामुळे काश्मीर इतर राज्यांशी जोडले गेले आहे. चिनाब रेल्वे पुल हा चीनाब नदीच्या मुख्य पात्रापासून तब्बल 359 मीटर उंचीवर असून त्याची लांबी 1.3 किलोमीटर आहे. विशेष म्हणजे हा फुल पॅरिस येथील आयफेल टॉवर पेक्षा जवळपास 35 मीटर जास्त उंच आहे.