Cibil Score : पैशांची गरज असली आणि पैसे नसले की अनेकजण कर्ज काढण्याचा पर्याय निवडत असतात. पण कर्ज देण्यासाठी बँकेकडून अनेक गोष्टी तपासून पाहिल्या जातात. त्यातही सर्वात प्रथम म्हणजे तुमचा सिबिल स्कोअर आणि उत्पन्नाचा स्रोत सर्वात प्रथम पाहिला जातो.
तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी तुमचा सिबिल स्कोअर पाहिला जातो आणि त्यानंतरच तुम्हाला कर्ज दिले जाते. पण जर तुमचा सिबिल स्कोअर खराब असेल तर कर्ज कसे मिळवायचे? त्यासाठी काय करावे लागेल या सर्व गोष्टी आज जाणून घेऊया…
सिबिल म्हणजे काय?
क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो लिमिटेड म्हणजेच CIBIL होय. सिबिल स्कोअर हा तीन अंकी असतो. प्रत्येकाचा सिबिल स्कोअर हा वेगवेगळा असतो. 300 हा सर्वात वाईट आणि 900 हा सर्वोत्तम CIBIL स्कोर आहे.
CIBIL स्कोअर दर्शवत असते की तुम्ही कर्जाची परतफेड कशा प्रकारे करू शकता. जर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर वाढवायचा असेल तर तुम्ही कर्ज घेऊन त्याची परतफेड योग्यरीत्या करून सिबिल स्कोअर वाढवू शकता. कर्जाची वेळेवर परतफेड केल्याने त्यामध्ये वाढ होते.
कर्ज घेण्यासाठी किती CIBIL आवश्यक आहे?
कर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे. जर तुमचा सिबिल स्कोअर खराब असेल तर बँक तुम्हाला तुमच्या उत्पन्नाच्या आधारे कर्ज देत असते. कर्ज घेत असताना तुमच्यावर अगोदरचे कर्ज नाही ना हे देखील तपासले जाते.
जर पहिले कर्ज नसेल तर तुम्हाला कर्ज दिले जाते. या कराजची वेळेवर परतफेड केल्यास तुमचा सिबिल स्कोअर देखील वाढतो आणि त्यानंतर पूर्वी घेतलेल्या कर्जापेक्षा जास्त कर्ज तुम्हाला दिले जाते.
कर्ज घेण्यासाठी CIBIL स्कोर चार श्रेणींमध्ये विभागलेला आहे
८०० च्या वर सिबिल स्कोअर
जर तुमचा सिबिल स्कोअर ८०० किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तुमचे उत्पन्न चांगले असेल तर तुम्हाला बँकेकडून सहज कर्ज दिले जते. ८०० पेक्षा जास्त सिबिल स्कोअर असलेले लोक वेळेवर कर्जाची परतफेड करत असतात.
700 ते 800 दरम्यान CIBIL स्कोर
७०० ते ८०० च्या दरम्यानचा सिबिल स्कोअर हा देखील चांगला मानला जातो. या स्कोअरमध्ये तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता ९५ टक्के असते. या सिबिल स्कोअरमध्ये तुम्हाला कर्ज देण्यास कोण नकार देणार नाही मात्र व्याजदरात बदल असू शकतात.
500 ते 700 दरम्यान CIBIL स्कोर
५०० ते ७०० हा सिबिल स्कोअर सरासरी मानला जातो. अनेक लोकांचा सिबिल स्कोअर हा ५०० ते ७०० इतका असतो. या सिबिल स्कोअरमध्ये देखील तुम्हाला कर्ज मिळू शकते. पण काही संस्था तुम्हाला कर्ज देण्यास टाळाटाळ करतात.
500 पेक्षा कमी
जर तुमचा सिबिल स्कोअर ५०० पेक्षा कमी असेल तर तो खूपच खराब आहे. ५०० पेक्षा कमी सिबिल स्कोअर हा खूपच कमी आहे. हा सिबिल स्कोअर असणारे लोक कर्जाची परतफेड वेळेवर करू शकत नाहीत असे गृहीत धरले जाते. जरी तुम्हाला कर्ज दिले तरी त्याचा व्याजदर हा खूपच असतो.
खराब सिबिलवर कर्ज कसे मिळवायचे?
तुम्ही अद्याप कोणतेही कर्ज घेतलेले नाही, ज्यामुळे तुमचा CIBIL स्कोर जनरेट झाला नाही, तर तुम्ही तुमचे नियमित उत्पन्न दाखवून कर्ज घेऊ शकता.
जर तुमचा CIBIL स्कोर खराब झाला असेल, तर बँक किंवा NBFC मध्ये मोठ्या रकमेसाठी अर्ज करू नका. तुम्ही कर्जामध्ये थोडी रक्कम घेतो आणि त्याची वेळेवर परतफेड करता. यामुळे तुमचा CIBIL स्कोर सुधारेल.
तुमचा CIBIL स्कोर खराब असल्यास, तुम्ही गॅरेंटरसह संयुक्त कर्ज घेऊ शकता. लक्षात ठेवा की त्या व्यक्तीचा CIBIL स्कोर चांगला असावा. तरच बँक तुम्हाला कर्ज देईल.
जर तुम्हाला जास्त पैशांची गरज असेल तर तुम्ही गोल्ड लोन देखील घेऊ शकता. या पेपरमध्ये काम नगण्य आहे आणि यामध्ये CIBIL ची गरज नाही. यामध्ये तुम्हाला सोन्याच्या किमतीच्या 75 टक्के रक्कम कर्ज म्हणून मिळते.
पैशांची गरज आहे, तुमची CIBIL खराब आहे आणि तुमची LIC पॉलिसी आहे, मग तुम्ही LIC पॉलिसीवर कर्ज देखील घेऊ शकता. तुम्हाला कर्ज देण्यासाठी ते तुमचा CIBIL स्कोर तपासत नाहीत.