CNG Cars : भारतामध्ये इंधनाच्या किमती गगनाला भिडल्याने अनेकजण सीएनजी कार आणि इलेक्ट्रिक कारकडे वळत आहेत. तसेच भारतामध्ये अशा अनेक सीएनजी कार आहेत ज्याच्या किमती ग्राहकांना परवडतील अशा आहेत. त्यामुळे तुम्हीही 6 लाखांपेक्षा कमी किमतीमध्ये सीएनजी कार खरेदी करू शकता.
भारतात अशा काही सीएनजी कार आहेत ज्या कमी किमतीमध्ये उपलब्ध असून त्यामध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच मायलेजच्या बाबतीतही या सीएनजी कार सर्वोत्तम आहेत.
मारुती सुझुकी अल्टो 800
मारुती सुझुकी कंपनीच्या अनेक कार भारतीय बाजारात अधिक लोकप्रिय आहेत. मारुती सुझुकी अल्टो 800 ही देशातील सर्वात स्वस्त आणि सर्वात लहान हॅचबॅक सीएनजी कार आहे. या कारचे इंजिन 40BHP पॉवर आणि 60Nm टॉर्क जनरेट करते. ही सीएनजी कार 30 km/kg पेक्षा जास्त मायलेज देते. या कारची किंमत 5.13 लाख रुपये आहे.
मारुती सुझुकी अल्टो K10
Maruti Suzuki Alto K10 ही देखील सर्वाधिक खप होणारी सुझुकीची कार आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.96 रुपये लाख आहे. गेल्या वर्षी ही कार सीएनजीमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या कारचे मायलेज 34 किमी प्रति किलो आहे.
मारुती सुझुकी एस-प्रेसो
तुम्हालाही सीएनजी कार कमी किमतीमध्ये खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी Maruti Suzuki S-Presso कार सर्वोत्कृष्ट आहे. ही कार 32 किमी/किलोपेक्षा जास्त मायलेज देते. या कारची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपये आहे.
मारुती सुझुकी वॅगन आर
मारुती सुझुकी वॅगन आर देखील देशातील सर्वाधिक लोकप्रिय असणारी कार आहे. या कारचे सीएनजी मॉडेलमधील इंजिन 56bhp पॉवरसह 82 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. ही कार 34.05 किमी/किलो मायलेज दाते. तसेच या कारची एक्स-शोरूम किंमत 6.43 लाख रुपये आहे.
टाटा टियागो सीएनजी
टाटा मोटरकडून देखील अनेक नवनवीन कार लॉन्च केल्या जात आहेत. Tata कंपनीने Tiago चे CNG मॉडेल बाजारात लॉन्च केले आहे. या कारमध्ये CNG तंत्रज्ञानासह 1.2-लिटर इंजिन बसवण्यात आले आहे. हे इंजिन 72 bhp पॉवर आणि 95 Nm पीक टॉर्क निर्माण करते. या कारची एक्स-शोरूम किंमत 6.44 लाख रुपये आहे.