CNG-PNG Price : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यातच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर होऊन सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. मात्र वाढत्या महागाईत वाहनधारकांना मोठा दिलासा मिळत आहे.
CNG-PNG च्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे CNG-PNG वाहनधारकांना मोठा दिलासा मिळला आहे. आता ग्राहकांना कमी दराने CNG-PNG गॅस मिळणार आहे. हे नवीन दर रविवार म्हणजेच उद्यापासून लागू होणार आहेत.
अदानी समुहापाठोपाठ आता इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) नेही CNG ची किंमत कमी करण्याची घोषणा केली आहे. दिल्लीत 6 रुपयांनी तर गाझियाबाद आणि नोएडामध्ये 5 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती शंभरी पार गेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी CNG गॅसवरील वाहने खरेदी केली मात्र त्याच्या किमती देखील प्रचंड वाढल्याने ग्राहकांना चांगलाच फटका बसत आहे.
केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या किमती ठरवण्याच्या सूत्रात बदल केले आहेत. यानंतर दिल्लीतील जनतेला हा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी सांगितले की घरगुती गॅसच्या किमती आता आंतरराष्ट्रीय हब गॅसऐवजी इंपोर्टेड क्रूडशी जोडल्या गेल्या आहेत.
आताच्या घसरणीनंतर दिल्लीत सीएनजी 73.59 रुपये किलो दराने विकला जात आहे. त्याच वेळी, नोएडामध्ये ते 73.59 रुपये प्रति किलो, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये 77.20 रुपये आणि गुरुग्राममध्ये 82.62 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे.
दिल्लीत सीएनजीची किंमत आता ७९.५६ रुपयांवरून ७३.५९ रुपये प्रति किलोवर आली आहे. दिल्लीत घरगुती एलपीजी (पीएनजी) दर 53.59 रुपये प्रति घनमीटर वरून 48.59 रुपये प्रति मानक घनमीटर करण्यात आले आहेत.
रविवारपासून CNG आणि PNG गॅसच्या नवीन किमती लागू होणार आहेत. ज्या ग्राहकांची वाहने CNG वर चालत आहेत अशा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. CNG वाहने परवडत असल्याने अनेकजण आता CNG कार खरेदी करत आहेत.
CNG कार उत्कृष्ट मायलेज देत असल्याने ग्राहकांच्या पैशांची देखील बचत होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सरकारकडून कमी केल्या जात नसल्याने अनेकजण CNG वाहने खरेदी करत आहेत.