भारत

Coca-Cola Smartphone : भारतात आज लॉन्च होणार कोका कोला स्मार्टफोन, पहा फीचर्स आणि किंमत एका क्लिकवर…

Coca-Cola Smartphone : भारतीय बाजारपेठेत अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत तर अनेक कंपन्या अजूनही नवनवीन स्मार्टफोन लॉन्च करत आहेत. आता रियलमी कंपनीकडून आज एक धमाकेदार स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे.

रियलमी कंपनीने कोका-कोलासोबत भागीदारी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रियलमी आणि कोका-कोला मिळून एक जबरदस्त स्मार्टफोन आज भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणार आहेत.

कोका-कोला ही कंपनी एका सॉफ्टड्रिंक्ससाठी ओळखली जाते. हे सॉफ्टड्रिंक्ससाठी जगभरात लोकप्रय आहे. Realme 10 Pro 5G कोका कोला एडिशन बाजारात आज उपलब्ध होणार आहे.

लॉन्च वेळ?

Realme कंपनीने Coca-Cola सोबत भागीदारी करत एक स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा केली होती. तोच स्मार्टफोन Realme 10 Pro 5G Coca-Cola Edition 10 फेब्रुवारी 2023 म्हणजेच आज लॉन्च होणार आहे. दुपारी 12.30 वाजता हा स्मार्टफोन लॉन्च केला जाणार आहे.

तपशील

Realme 10 Pro 5G Coca-Cola Edition स्मार्टफोन बाबत अनेक माहिती लीक झाली होती. 20Hz रिफ्रेश रेट, DC डिमिंग आणि 680 निट्स पीक ब्राइटनेससह फ्लॅट 6.7-इंच FHD+ LCD डिस्प्लेसह Realme 10 Pro या स्मार्टफोनमध्ये असण्याची शक्यता आहे.

स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटसह देण्यात येणार आहे. तसेच 8GB RAM आणि 256GB अंतर्गत स्टोरेजसह बाजारात उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच कंपनीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती सामायिक करण्यात आलेली नाही.

हा स्मार्टफोन 108MP मुख्य कॅमेरासह 2MP पोर्ट्रेट कॅमेरासह देण्यात येणार आहे. फोनच्या समोर 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. वापरकर्त्यांना Jio चे 5G नेटवर्क अनुभवण्यासाठी realme 10 Pro स्मार्टफोनवर बॉक्स 5G SA, NRCA आणि VoNR बाहेर आणण्यासाठी realme ने Jio सोबत भागीदारी केली आहे.

इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर फोनमधील फिंगरप्रिंट सेन्सर बाजूला असलेल्या पॉवर बटनमध्ये एम्बेड केला जाणार आहे. स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट देण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts