दिलासादायक ! कोरोना प्रतिबंधात्मक औषध अखेर भारतात लॉन्च

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. याला रोखण्यासाठी भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाने म्हणजेच डीआरडीओने २-डीऑक्सी-डी-ग्लूकोज हे औषध शोधले आहे.

तसेच आज केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते लाँच करण्यात आले आहे. हायड्रॉक्‍सीक्‍लोरोक्विन, रेमडिसिविर, आइवरमेक्टिन सारख्या अन्य औषधांवर गेल्या वर्षीपासून संशोधन सुरु आहे.

मात्र, कोरोना विरोधी औषध म्हणून २DG हे पहिलेच औषध असून ते निर्माण करण्यास डीआरडीओच्या संशोधकांना यश आले आहे. २-DG चे किती डोस घ्यायचे ? एका पाकिटात हा डोस मिळेल. कोरोना रुग्णाला ORS जसे पाण्यात मिसळतात आणि पितात तसेच प्यावे लागणार आहे.

हे औषध दिवसामधून २ वेळा घ्यावे लागेल. कोरोना रुग्ण पूर्णपणे ठीक होण्यासाठी हे औषध ५ ते ७ दिवस प्यावे लागणार आहे. असे डॉ. सुधीर चंदना यांनी माहिती दिली आहे. या डोसचा दर किती असणार? दराबाबत आजूकाही जारी केलं नाही.

त्याची किमंत आज जारी करण्यात येणार आहे. चंदना यांनी म्हटले की, या औषधाच्या दराचा निर्णय डॉ. रेड्डीज कंपनी घेणार आहे. परंतु, हे औषध परवडणारे असेल यावर लक्ष दिले जाईल. तर एका पाकिटाचा दर ५०० ते ६०० रुप्याच्या आसपास असणार आहे.

असे सूत्रांकडून समजते. हे औषध आज लॉन्च झाले असून पुढील दोन ते तीन दिवसात बाजारात उपलब्ध होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या औषधाचे उत्पादन वाढविण्यात आले आहे, जेणेकरुन जास्तीत जास्त लोकांना हे औषध मिळेल.

डॉ. चंदना म्हणाले की, चाचणीच्या दरम्यान सामान्य आणि गंभीर रुग्णांना हे औषध देण्यात आले आहे. सर्व रुग्णांना याचा फायदा झाला आहे. विशेष म्हणजे याचा कोणताच साइड इफेक्ट झालेला नाही.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts