दिलासादायक ! कोरोनाची ही लस ठरतेय 90 टक्के प्रभावी

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- कोरोना विषाणूनं गेल्या वर्षभरापासून जगाला वेठीस धरलेलं आहे. मात्र आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर देशातून ओसरतो आहे.

अशातच एक चांगली बातमी समोर आली आहे. कोरोना विरोधातील लस निर्मितीत शास्त्रज्ञांना आणखी एक यश आलं आहे. कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक देश आता जास्तीत जास्त लसीकरणावर भर देत आहे.

अशाच लस निर्मिती करणाऱ्या नोवाव्हॅक्स कंपनीनं त्यांनी आणलेली लस कोरोनाच्या नव्या व्हेरिअंट विरोधात देखील ९० टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे.

नोवाव्हॅक्स या अमेरिका स्थित कंपनीनं गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटसोबत करार केला आहे.

याअंतर्गत सीरम इन्स्टिट्युटमध्ये नोवाव्हॅक्सचे २०० डोस तयार केले जाणार आहेत. दरम्यान “नोवाव्हॅक्स लस कोरोना विरोधात ९० टक्के प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं आहे

आणि सुरुवातीच्या आकडेवारीनुसार लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचंही समोर आलं आहे”, असं कंपनीकडून जाहीर करण्यात आलं आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts