Hyundai Car : ह्युंदाई कंपनीच्या अनेक कार भारतीय ऑटो क्षेत्रात वर्चस्व गाजवत आहेत. तसेच कंपनीकडून अनेक नवनवीन कार देखील सादर केल्या जात आहेत. तसेच आता ह्युंदाई कंपनीने लोकप्रिय असणाऱ्या दोन कार स्वस्त केल्या आहेत. त्यामुळे आता ग्राहक कमी किमतीमध्ये या कार खरेदी करू शकतात.
जर तुम्हीही ह्युंदाई कार खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण किंमत कमी झाल्याने तुमच्या पैशांची बचत देखील होईल आणि कार खरेदी करण्याचे स्वप्न देखील पूर्ण होईल.
ह्युंदाई कंपनीकडून हॅचबॅक कार i20 च्या किमती कमी केल्या आहेत. i20 कार खरेदी करू इच्छित असणाऱ्या लोकांसाठी ही चांगली बातमी आहे. चला जाणून घेऊया कंपनीकडून किंमत किती कमी करण्यात आली.
दोन इंजिन पर्याय उपलब्ध
ह्युंदाई कंपनीकडून i20 Sportz मॉडेल 3,500 रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहे. कंपनीकडून किमतीमध्ये कमी केल्यानंतर आता ही कार 8.05 लाख रुपये किमतीला मिळत आहे.
तसेच i20 Sportz IVT ची देखील किंमत 3,500 रुपयांनी स्वस्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता या कारची नवीन किंमत 9.07 लाख रुपये झाली आहे. कार खरेदी करताना तुमचे 3,500 रुपये वाचू शकतात.
सामान्य मॅन्युअल एसी प्रणाली उपलब्ध
मिळालेल्या माहितीनुसार Hyundai ने किंमत कमी केल्यानंतर या प्रकारात बदल करून ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल फीचर काढून टाकले आहे. आता ते कारमधील हीटरसह सामान्य मॅन्युअल एसी प्रणालीने बदलली जाईल.
या स्पोर्ट्स कारमध्ये शक्तिशाली इंजिन आहे जे 81.8 bhp पॉवर आणि 114.7Nm टॉर्क जनरेट करते. आणि 1.0-लिटर, टर्बोचार्ज्ड पेट्रोल. टर्बो इंजिन 118.4bhp पॉवर आणि 172Nm पीक टॉर्क निर्माण करते.