भारत

Aadhar Card Update : मस्तच! आता घरबसल्या आधारकार्डमधील चुका होणार दुरुस्त, या सोप्या पद्धतीने बदला नाव, पत्ता आणि जन्मतारीख…

Aadhar Card Update : देशात सर्व नागरिकांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले. कोणत्याही ठिकाणी कोणतेही काम करण्यासाठी सर्वात प्रथम आधारकार्ड मागितले जाते. आजकाल आधार कार्ड शिवाय कोणतेच काम होत नाही असे म्हणले तरीही काही वावगे ठरणार नाही.

अनेकदा आधारकार्ड काढत असताना त्यावर चुका होत असतात. त्यामुळे अनेक ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र आता घरबसल्या आधारकार्डवरील चुका दुरुस्त करता येऊ शकतात.

आधार कार्ड ऑनलाइन अपडेट

जर तुम्हाला आधार कार्डवरील तुमचे नाव, पत्ता आणि जन्मतारीख बदलायची असेल तर तुम्ही घरबसल्या ते दुरुस्त करू शकता. आता UIDAI ने नागरिकांसाठी घरबसल्या चुका दुरुस्त करण्याची सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने आधारकार्ड अपडेट करता येऊ शकते.

ज्या लोकांनी लहानपणी आधारकार्ड काढले आहे अशा लोकांना आधारकार्डवरील फोटो बदलायचा असतो. मात्र या अगोदर ते घरबसल्या करणे शक्य नव्हते मात्र आता ते शक्य झाले आहे.

आता आधारकार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रात जाण्याची गरज नाही. UIDAI ने आता ऑनलाईन पद्धतीने आधार कार्डवरील माहिती दुरुस्त करण्याची सुविधा आणली आहे.

आधारमधील माहिती कशी दुरुस्त करावी

आधार कार्ड अपडेट करणे खूप सोपे झाले आहे. अट फक्त एवढी आहे की मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक असावा. यानंतर तुम्ही घरबसल्या तुमच्या आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख आणि पत्ता सहज अपडेट करू शकता. आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करत असताना, तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर OTP पडताळणी कोड प्राप्त होईल.

आधार कार्ड ऑनलाइन कसे अपडेट करायचे

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी, सर्वप्रथम UIDAI Uidai.Gov.In च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

वेबसाइटच्या होम पेजवर लॉगिन बटणावर क्लिक करा

लॉगिन बटणावर क्लिक केल्यानंतर, तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि OTP पाठवा वर क्लिक करा.

तुमच्या आधार कार्ड क्रमांकाशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला OTP सत्यापित करा

यानंतर ऑनलाइन आधार सेवा तुमच्या स्क्रीनवर दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, ईमेल आयडी, लिंग, मोबाइल नंबर आणि पत्ता अपडेट करण्याची यादी मिळेल.

तुम्हाला ज्यावर माहिती अपडेट करायची आहे ती निवडा.

यानंतर, सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणतेही प्रमाणपत्र अपलोड करा ज्यामध्ये तुमची योग्य माहिती उपलब्ध आहे.

शेवटी सबमिट बटणावर क्लिक करा

तुमची आधार कार्ड अपडेट विनंती यशस्वीरित्या सबमिट केली गेली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts