भारत

CNG Cars : मस्तच! आता 3 लाख ते 4 लाख रुपयांमध्ये खरेदी करता येणार या 5 सीएनजी कार, पहा यादी

CNG Cars : आजकाल अनेकजण इंधनावरील कार खरेदी करण्याकडे पाठ फिरवत आहेत. इंधनावरील कारला पर्याय म्हणून आता इलेक्ट्रिक कार आणि सीएनजी कार खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. अनकेजण जुन्या पेट्रोल कारला सीएनजी कार बनवत आहेत.

जर तुम्हाला सीएनजी कार खरेदी करायची असेल तर बाजारात सध्या स्वस्त सीएनजी कार उपलब्ध आहेत. त्या खरेदी करून तुम्हीही पैशांची चांगली बचत करू शकता. बाजारात अशा ५ सीएनजी कार आहेत ज्या तुम्हाला 3 लाख ते 4 रुपयांपर्यंत मिळतील.

मारुती सुझुकीच्या ट्रू व्हॅल्यू वेबसाइटवर या कार उपलब्ध आहेत. या वेबसाइट वर जाऊन तुम्ही विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या ५ सीएनजी कार तुम्ही पाहू शकता आणि किंमतही जाणून घेऊ शकता.

१. या ऑनलाईन वेबसाइटवर मारुती सेलेरियो VXI CNG ची किंमत 3.33 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही कार 2019 मध्ये खरेदी करण्यात आली आहे आणि या कारने एकूण 77670 किमी अंतर कापले आहे. यात पेट्रोल इंजिनसोबत एक सीएनजी किटही मिळते. सध्या ही कार ठाण्यामध्ये उपलब्ध आहे.

२. मारुती वॅगन आर VXI CNG ची किंमत 3.55 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. हे कार मॉडेल २०१७ मधील आहे. या कारने एकूण 75747 किमी अंतर कापले आहे. पेट्रोल इंजिनसोबत एक सीएनजी किटही मिळते, सध्या ही कार फरिदाबादमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

३. मारुती अल्टो K10 LXI (O) देखील सूचीबद्ध आहे ज्याची किंमत 3.60 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या कारचे मॉडेल 2017 मधील आहे आणि आजपर्यंत एकूण 95524 किमी अंतर कापले आहे. त्यात सीएनजी किट बसवण्यात आले आहे. सध्या ही कार पुण्यामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

४. मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू वेबसाइटवर मारुती अल्टो 800 LXI CNG ही कार विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. या कारची किंमत 3.75 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही कार 2020 मॉडेल आहे आणि आतापर्यंत एकूण 57610 KM धावली आहे.

५. आणखी एक मारुती वॅगन आर एलएक्सआय सीएनजी देखील येथे सूचीबद्ध आहे, या कारची किंमत 4 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या कारचे मॉडेल 2017 मधील आहे. या कारने एकूण 21719 किमी अंतर कापले आहे. त्यात सीएनजी किटही मिळते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: CNG cars

Recent Posts