Solar AC : देशात सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. त्यामुळे आता हळूहळू उष्णतेत वाढ होणार आहे. उष्णतेत वाढ झाल्यानंतर अनेकजण घर ठेवण्यासाठी विविध उपाय करत असतात. तर काही जण इलेक्ट्रिक उपकरण वापरत असतात. ती खरेदी करण्याकडे लोकांचा कल जास्त असतो.
उन्हाळ्यामध्ये एसी किंवा कुलर चालविल्याने वीजबिल जास्त येत असते. त्यामुळे अनेकजण एसी आणि कुलर वापरणे देखील टाळत असतात. मात्र आता बाजारात एक असा एसी आला आहे जो दिवसभर चालवला तरीही वीजबिल शून्य येईल.
आज तुम्हाला २४ तास चालूनही वीजबिल शून्य येईल असे ०.८ टन, १ टन, १.५ टन आणि २ टन क्षमतेच्या एसी बद्दल सांगणार आहोत. हे एसी बाजारात कमी किमतीमध्ये देखील उपलब्ध आहेत.
विंडो आणि स्प्लिट दोन्ही पर्याय
जर तुम्ही हा कमी किमतीमधील एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या एसीमध्ये सोलर एसी स्प्लिट आणि विंडो अशा दोन्ही पर्यायांमध्ये खरेदी करता येतात, या पर्यायांसह ग्राहकांना त्यांच्या घरानुसार विंडो किंवा स्प्लिट एसीचा योग्य पर्याय निवडता येतो.
सोलर एसीची किंमत बाजारामध्ये कमी आहे. तसेच त्याच्या वेगवेगळ्या क्षमतेनुसार त्याच्या किमतीही वेगवगेळ्या आहेत. 1.5 टन सोलर एसीची किंमत 2 लाख रुपये असेल.
दरमहा मोठी बचत होईल
एकवेळची गुंतवणूक म्हणून सोलर एसीवर थोडी जास्त रक्कम खर्च केली तरीही भविष्यात तुमचे वीजबिल शून्य येणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला वीजबिल भरावे लागणार नाही.
जर तुम्ही सामान्य एसी खरेदी केला तर तुम्हाला महिन्याला ५ ते ६ हजार रुपये बिल येत असते. पण सोलर एसीमुळे तुम्हाला वीजबिल येणारच नाही. हा सर्वात मोठा फायदा आहे.
सोलर एसीमध्ये छतावर बसवलेल्या पॅनल्सच्या बॅटरी बदलण्याचा खर्च येतो. बॅटरीही दीर्घकाळ टिकते त्यामुळे त्याचाही खर्च लगेच करावा लागत नाही. हा एसी 25 वर्षे आरामात वापरता येऊ शकतो.