Aadhaar Card Update : देशातील सर्व नागरिकांना केंद्र सरकारकडून आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांकडे आधारकार्ड आहे. मात्र सरकारकडून अनेकदा आधारकार्ड नियमांमध्ये बदल केले जात आहेत.
दर १० वर्षांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय सर्व नागरिकांना त्यांची आधार माहिती अपडेट किंवा सत्यापित करण्याचा सल्ला देण्यात येतो. आधारकार्डाशी संबंधित घोटाळे आणि आर्थिक फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्याचा यामागे उद्देश आहे.
UIDAI ने आधार कार्ड अपडेट करण्याचे आवाहन केले आहे
केंद्र सरकारकडून आधारकार्ड वरील माहिती अपडेट करण्यास सांगितले आहे. यासाठी अनेक सूचना जरी करण्यात आल्या आहेत. यासंबंधी UIDAI ट्विट करत माहिती दिली आहे.
ऑनलाइन कसे कराल आधारकार्ड अपडेट?
सर्व प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
आता ‘माय आधार’ विभागांतर्गत ‘डेमोग्राफिक डेटा अपडेट करा आणि स्थिती तपासा’.
यानंतर, तुम्हाला वेगळ्या अधिकृत वेबसाइटवर रीडायरेक्ट केले जाईल.
तुमच्या तपशीलांसह लॉग इन करा.
आता, तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा, आणि कॅप्चा कोडसह स्वतःची पडताळणी करा. ‘ओटीपी पाठवा’ वर क्लिक करा.
तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर तुम्हाला वन-टाइम पासवर्ड किंवा ओटीपी मिळेल.
त्यानंतर ‘Proceed to Update Aadhaar’ वर क्लिक करा.
आता, तुम्हाला अपडेट करायचा असलेला विभाग निवडा आणि तुम्ही इनपुट करू इच्छित तपशील प्रविष्ट करा.
लक्षात घ्या की पत्त्याचा पुरावा म्हणून तुम्हाला अधिकृत दस्तऐवज अपलोड करणे आवश्यक आहे.
‘Proceed to Update Aadhaar’ वर क्लिक करा.
शेवटी, तुमचा पत्ता अद्ययावत करण्यासाठी रु.50 ची नाममात्र फी भरा.