Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण होत आहे. तसेच पेट्रोलियम कंपन्यांनी आजच्यासाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. 16 मार्च 2023 साठी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत.
आजची भारतीय तेल विपणन कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सलग २९५ वा दिवस असून इंधनाच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.
देशात दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम हात आहे. वाहुकीचा खर्च वाढल्याने सर्वच जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत.
21 मे 2022 रोजी उत्पादन शुल्कात या राज्यांनी कपात केली होती
काही राज्यातील सरकारांनी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 21 मे रोजी कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली होती. राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती.
देशातील महानगरांमध्ये आजचा पेट्रोल डिझेलचा दर
मुंबई- पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
दिल्ली- पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
चेन्नई – पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकाता – पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण
आंतराराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मात्र तरीही देशात इंधनाच्या किमती कमी होत नाहीत. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने सध्या क्रूड ऑइल प्रति बॅरल $ 75.42 च्या जवळ पोहोचले आहे आणि ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 81.56 वर पोहोचले आहे.