भारत

Dating Apps पासून सावधान! प्रेम प्रकरण पडणार भारी, फसवणुकीचा ‘हा’ नवीन प्रकार जाणून वाटेल आश्चर्य

Dating Apps : आज या सोशल मीडियाच्या काळात दररोज देशात अनेकांची आर्थिक फसवणूक होत आहे. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का ? सर्वात जास्त फसवणूक सध्या डेटिंग साइटवर होताना दिसत आहे.

या साइटवर ऑनलाइन प्रेम शोधण्याच्या नादात अनेकांची फसवणूक होत आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार अनेक महिला डेटिंग अॅपवर लोकांची फसवणूक करत आहेत. फसवणूक करणारी महिला या डेटिंग अॅपवर  जोडीदार शोधण्याच्या नावाखाली एका व्यक्तीशी ऑनलाइन संपर्क करते आणि त्यानंतर  त्याला खोट्या प्रकरणात अडकवून मोठी आर्थिक फसवणूक करते.

सध्या अशीच एक घटना सोशल मीडियावर चर्चेत आहे.  हे जाणून घ्या कि ही घटना  गुडगावमधील आहे. जिथे एका व्यक्तीने बंबलवर  खाते तयार केले आणि त्याला एक महिला सापडली ज्याने त्याचे ऑनलाइन 2 लाख रुपये लुटले.

पीटीआयच्या रिपोर्टनुसार या प्रकरणी बिहारमधील एका महिलेला आणि तिच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे, ज्यांनी अशा सुमारे 12 लोकांना आपला शिकार बनवले आहे. ही महिला बंबल अॅपच्या माध्यमातून लोकांना तिच्याशी जोडायची. त्यानंतर ती त्याच्याशी बोलायची. यानंतर ती व्यक्तीला बलात्कार आणि विनयभंगाच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत असे आणि उलट लोकांकडे पैशांची मागणी करत असे. अशा वेळी पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी बहुतांश लोक पैसे देत असत. मात्र, यावेळी पोलिसांनी त्याला पकडले.

एफआयआर नोंदवला

या प्रकरणी हरियाणातील रहिवासी महेशा फोगट यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महेश हा हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील रहिवासी आहे. बिहारमधील रहिवासी बिनिता कुमारी असे आरोपीचे नाव आहे. बिनिता कुमारी या शहरातील एका आयटी कंपनीत काम करतात.

अशा चुका करू नका

डेटिंग साइट्स आणि बंबल सारख्या अॅप्सवर नेहमी व्हेरिफाय प्रोफाइलशी संपर्क साधा.

अशा डेटिंग अॅप्सवर कोणाला  धमकावणे किंवा लैंगिक छळासारखे वागू नका.

हे पण वाचा :- RBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘इतक्या’ पदांसाठी होणार भरती, मिळणार 71 हजार रुपये वेतन

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts