Petrol Diesel Price : इंधनाच्या किमती वाढल्याने देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. इंधनाच्या किमती वाढल्याने वाहतुकीवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे सर्वच वस्तू महाग होत चालल्या आहेत. आज पेट्रोल डिझेलबाबत मात्र दिलासा मिळत आहे.
पेट्रोलियम कंपन्यांकडून आज पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. १३ मार्च २०२३ साठी इंधनाच्या किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. २ दिवस सुट्टीनंतर आज पुन्हा नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत.
पेट्रोलियम कंपन्यांनी १३ मार्चसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज सलग २९३ वा दिवस आहे तेव्हापासून इंधनाच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
देशातील या ठिकाणी मिळतेय सर्वात स्वस्त पेट्रोल
देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे आहेत. पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल मिळत आहे. पेट्रोलचा दर 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 79.74 रुपये प्रति लिटर आहे.
देशातील प्रमुख शहरातील दर
देशातील प्रत्येक शहरामध्ये पेट्रोल आणि डिझेल वेगवेगळ्या दरामध्ये विकले जात आहे. गेल्या २९३ दिवसांपासून यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. किमती वाढल्याची नाहीत आणि कमीही झाल्या नाहीत.
दिल्ली- पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबई- पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
कोलकाता – पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
चेन्नई – पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. मात्र त्याचा परिणाम देशातील इंधनाच्या किमतीवर दिसून येत नाही. या घसरणीनंतर, WTI क्रूड प्रति बॅरल $ 75.42 च्या जवळ पोहोचले आहे आणि ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 81.56 वर पोहोचले आहे.