भारत

Diamond Apple: बापरे! एका सफरचंदाची किंमत आहे 500 रुपये, काय आहे या मागील कारण? वाचा ए टू झेड माहिती

Diamond Apple:- भारत हा देश विविधतेने नटलेला असून भारतीय परंपरा, भाषा तसेच पोशाख, चालीरीती तसेच परंपरा, सांस्कृतिक परंपरा इत्यादी अनेक बाबतीत भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. ज्याप्रमाणे सामाजिक जीवनामध्ये विविधता दिसून येते तसेच भारतामध्ये नैसर्गिक विविधता देखील मोठ्या प्रमाणावर दिसून येते.

उदाहरणच घ्यायचे झाले तर भारतामध्ये काही अशी पिके आहेत की ती त्या त्या भागामध्येच मोठ्या प्रमाणावर पिकतात किंवा उत्पादन देतात. तसेच पिकांमध्ये देखील खूप मोठी विविधता दिसून येते. झाडे, जंगलांमधील वनसंपत्ती ही देखील भारतातील राज्यनिहाय विचार केला तर वेगवेगळ्या स्वरूपाची आहे.

कारण भारताची भौगोलिक परिस्थिती देखील एक सारखे नसून ती वेगवेगळी आहे. जर आपण जगाच्या पाठीवर विचार केला तर ही विविधता दिसून येते व ती फळांमध्ये सुद्धा असते. निसर्गाकडून आपल्याला विविध प्रकारची व चवीची फळांची देणगी मिळालेली असून मानवी आरोग्यासाठी यातील काही फळे खूप महत्वपूर्ण देखील आहेत.

जगाच्या पाठीवर देखील हवामानानुसार वेगवेगळ्या प्रकारची फळे आपल्याला दिसून येतात यातील काही फळे त्यांच्या आकर्षक अशा वैशिष्ट्यांमुळे इतर फळापेक्षा वेगळे दिसून येतात किंवा ते लोकांचे लक्ष वेधून घेतात. याच मुद्द्याला धरून जर आपण डायमंड सफरचंदाचा विचार केला तर हे सफरचंद देखील अनेक वैशिष्ट्यांमुळे खूप प्रसिद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण असून  इतर सफरचंदांच्या वाणांपेक्षा हे वेगळे सफरचंद आहे.

 डायमंड सफरचंदाची वैशिष्ट्ये

डायमंड सफरचंद हे आंबट आणि गोड चवीचे असून त्याचा रंग देखील खूप सुंदर असल्यामुळे त्यांना एक विशेष वैशिष्ट्य मिळालेले आहे. एका डायमंड सफरचंदाची किंमत जर आपण पाहिली तर ती पाचशे रुपये इतकी असून हे सफरचंद चीनमध्ये असलेल्या तिबेट येथील निंगची पर्वतरांगांमध्ये सहसा आढळून येते.

हे मर्यादित प्रमाणात असलेले सफरचंद असून याची विक्री देखील ठराविक ठिकाणीच होते. म्हणूनच या सफरचंदाची किंमत इतकी जास्त प्रमाणात आहे. विशेष म्हणजे या सफरचंदाची विक्री देखील चीनमधील सर्वात महत्त्वाच्या अशा विक्रेत्यांकडेच केली जाते. सहजा सहजी डायमंड सफरचंद मिळणे कठीण असून ते प्रत्येक व्यक्तीला एका मर्यादित स्वरूपातच मिळतात.

हे सफरचंदचा चव अतिशय गोड असते व याचा बाहेरचा भाग हा घट्ट व अतिशय कडक असल्यामुळे या सफरचंदाला हिऱ्यासारखी चमक असते. हे फळ गडद जांभळ्या रंगाचे असून त्यातील आतील गर हा पांढऱ्या रंगाचा असतो. जर आपण या क्षेत्रातील जाणकारांचा किंवा अभ्यासकांच्या मताचा विचार केला तर त्यांच्या मते ज्या प्रदेशामध्ये हे सफरचंद आढळते त्या प्रदेशातील बदलणाऱ्या तापमानाला आणि मुबलक अशा अतिनील किरणांमुळे  या सफरचंदाला काळा रंग प्राप्त झालेला आहे.

विशेष म्हणजे सामान्य सफरचंद तयार होण्यासाठी दोन किंवा तीन वर्षाचा कालावधी लागतो व त्या तुलनेत जर आपण डायमंड सफरचंदाचा विचार केला तर त्याला तयार होण्याकरिता आठ वर्षाचा कालावधी लागतो. साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या आसपास दोन महिन्यांकरिता हे तयार सफरचंद आपल्याला त्या ठिकाणी मिळते. तसेच जे सफरचंद मिळतात त्यातील देखील सर्वच दर्जेदार असतील असं देखील नाही. जे सफरचंद आपल्याला तयार स्वरूपात मिळतात त्यापैकी केवळ 30% सफरचंद बाजारात विक्रीसाठी लायक असतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts