भारत

‘हा’ आहे देशातील सर्वात लांब रेल्वे प्रवास! ट्रेन कापते 4 दिवसात 4 हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर; 9 राज्यांमधून करते प्रवास

भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर रेल्वेचे जाळे असून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आता रेल्वे नेटवर्क विस्तारले जात आहे व ज्या ठिकाणी अजूनपर्यंत रेल्वेमार्ग नव्हतेत्या ठिकाणी आता रेल्वे मार्ग उभारण्याचे काम केले जात आहे. वाहतुकीच्या दृष्टिकोनातून भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठे नेटवर्क असून भारतातील प्रवासी वाहतूक आणि मालवाहतुकीच्या दृष्टिकोनातून भारतीय रेल्वेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

तसेच भारतीय रेल्वेच्या बाबतीत जर पाहिले तर अनेक अशा आश्चर्यकारक गोष्टी आहेत की ज्यापैकी बऱ्याच आपल्याला माहिती नाहीत. भारतीय रेल्वे अनेक पर्वतांपासून तसेच जंगलांमधून देखील प्रवास करते व असा प्रवास पार करत इच्छित स्थळापर्यंत प्रवाशांना सुखरूप पोहोचवते.

तुम्हाला माहित आहे की भारतामध्ये सर्वात लांब रेल्वेने प्रवास कुठल्या मार्गाने करावा लागतो? तर याच लांब प्रवास मार्गाच्या आपल्या लेखात माहिती घेऊ.

 आसाममधील दिब्रुगड ते तामिळनाडूमधील कन्याकुमारी हा आहे सर्वात लांबचा रेल्वे प्रवास

भारतातील या मार्गावरील रेल्वे प्रवासात सर्वात लांबचा रेल्वे प्रवास असून तुम्ही एकदा रेल्वेत शिरलात तर तुम्हाला चार दिवस एकाच बोगीमध्ये बसून राहावे लागते. हा प्रवास आसाम मधील दिब्रुगड येथून सुरू होतो आणि चार दिवसानंतर तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथे संपतो. त्यातील हा सर्वात लांब रेल्वे प्रवास असून हा प्रवास विवेक एक्सप्रेस नावाच्या ट्रेनने पूर्ण करता येतो.

विवेक एक्सप्रेस चार दिवसांमध्ये तब्बल चार हजार किलोमीटर पेक्षा जास्तीचा प्रवास पूर्ण करते. दिब्रुगड ते कन्याकुमारी दरम्यान  विवेक एक्सप्रेस सुरू करण्याची घोषणा 2011-12 या रेल्वेच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली होती व स्वामी विवेकानंद यांच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने या ट्रेनची सुरुवात झाली.

विवेक एक्सप्रेस हा प्रवास पूर्ण करताना तब्बल नऊ राज्यांमधून जाते. ही ट्रेन आसाम, नागालँड, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमधून प्रवास करते व हा प्रवास पूर्ण करण्यासाठी चार दिवस लागतात.

विवेक एक्सप्रेसला एकूण 19 डबे असून ही ट्रेन 4189 किलोमीटर अंतर कापते व यासाठी 75 तास त्याला लागतात. या प्रवासादरम्यान ती तब्बल 59 रेल्वे स्टेशनवर थांबते. ही सर्वात लांब अंतर कापणारी ट्रेन आठवड्यातून फक्त दोन दिवस धावते.

हा रेल्वे प्रवास भारतीय रेल्वेचा सर्वात लांबचा प्रवास असून अनेक राज्यातील लोकांना या विवेक एक्सप्रेसच्या माध्यमातून प्रवासाचा खूप मोठा फायदा मिळतो.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts