PM KISAN : केंद्र सरकारने देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सुरु केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना १२ हफ्ते देण्यात आले आहेत. तसेच १३ वा हफ्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 फेब्रुवारी 2023 रोजी कर्नाटकात DBT द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वर्ग केले आहेत. जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या नोंदणी कृत मोबाईल नंबरवर पैसे जमा झाल्याचा एसएमएस येईल.
मात्र लाखो शेतकऱ्यांना १३ वा हफ्ता मिळालेला नाही. त्यामागे अनेक करणे आहेत. मात्र अशा शेतकऱ्यांना काही काम करावे लागेल त्यानंतरच त्यांच्या खात्यात १३वा हफ्ता जमा केला जाईल.
१३वा हफ्ता न मिळण्याची २ मुख्य करणे असू शकतात
१. PM किसान योजना EKYC केले नाही
केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. जर तुम्ही ई-केवायसी केलेले नसेल तर तुमच्याही खात्यात १३व्या हफ्त्याचे पैसे जमा केले जाऊ शकत नाहीत. ई-केवायसी केल्यानंतरच तुम्हाला १३वा हफ्ता जारी केला जाऊ शकतो.
२. लाखो अपात्र शेतकऱ्यांना योजनेतून काढून टाकले
केंद्र सरकारकडून ही योजना फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. मात्र या योजनेचा अनेक अपात्र शेतकरीही लाभ घेत होते. १३वा हफ्ता जारी करण्यापूर्वी केंद्र सरकारने अपात्र शेतकऱ्यांना या योजनेतून काढून टाकले आहे. जर तुम्हाला याबाबत तपासणी करायची असेल तर तुम्ही अधिकृत पोर्टल वर जाऊन तुम्ही पाहू शकता.
लाभार्थी यादीत नाव पहा
जर तुम्हाला १३ वा हफ्ता मिळालेला नसेल तर तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन लाभार्थी यादी पाहू शकता. पोर्टलच्या होम पेजवर लाभार्थी यादीवर क्लिक करा.
यानंतर, तुमच्या जिल्ह्याचे, उपजिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव निवडा आणि Get Report वर क्लिक करा. यानंतर तुमच्या गावाची पीएम किसान योजना यादी तुमच्यासमोर उघडेल. ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव पाहू शकता.
पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा
जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात आणि तुम्हाला 2000 रुपयांचा हप्ता मिळाला नाही, तर तुम्ही विभागाकडून जारी केलेल्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क करून त्याबद्दल माहिती मिळवू शकता. पीएम किसान योजना हेल्पलाइन क्रमांक – 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092.