Water Expiry : सजीव घटकांच्या जीवनात पाणी हे एक अविभाज्य घटक आहे. कोणताही सजीव प्राणी पाण्याशिवाय जगू शकत नाही. तसेच पाण्याबद्दल अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्याही असतील. मात्र पाण्याचीही एक्स्पायरी डेट असते हे तुम्ही कधी ऐकले आहे का?
पाण्याची चव ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते. तर अनेक ठिकाणी तुम्ही अनेकवेळा तुम्ही ऐकले असेल की पाणी खराब झाले. मात्र पाण्याची खर्च एक्स्पायरी डेट असते का? तर चला जाणून घेऊया पाण्याच्या एक्स्पायरी डेटबद्दल…
बाटल्यांच्या वर असे का लिहिले आहे?
सध्या बाहेर कुठे फिरायला गेला तर दुकानातून अनेकवेळा पाण्याची बाटली खरेदी केली जाते. तसेच वेगवेगळ्या कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्या बाजारात उपलब्ध आहेत. पाण्याच्या बाटलीवर किमतीसोबत एक्स्पायरी डेट देखील लिहलेली असते.
जर पाण्याची एक्स्पायरी डेट नसते असे अनेकजण म्हणत असतात किंवा पाणी खराब होत नाही असे म्हंटले जाते पण पाण्याच्या बाटलीवर एक्स्पायरी डेट का लिहली जाते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
पाण्याच्या बाटल्यांची एक्सपायरी डेट
पाण्याच्या बाटलीवर किमतीसोबत एक्स्पायरी डेट लिहलेली असते. मात्र ही एक्स्पायरी डेट पाण्याची नसून त्या बाटलीची असते. पाण्याच्या बाटल्या या प्लास्टिकच्या असतात. ठरविक काळानंतर प्लास्टिक पाण्यात विरघळते असे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे पाण्याच्या बाटलीवर एक्स्पायरी डेट लिहलेली असते.
पाण्याची एक्स्पायरी डेट नाही!
आता पाण्याचीही एक्स्पायरी डेट असते की नाही हा प्रश्न येतो. पण पाण्याला कधीही एक्स्पायरी डेट नसते. अशा अनेक प्रक्रिया आहेत ज्याद्वारे पाणी शुद्ध केले जाते. तथापि, असे निश्चितपणे सांगितले जाते की जर पाणी जास्त वेळ एकाच ठिकाणी ठेवले असेल तर ते पिण्यापूर्वी ते स्वच्छ करणे किंवा शुद्ध करणे आवश्यक आहे.