अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- कोरोना संसर्गामुळे यंदाच्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पण बदल करण्यात आले आहेत. प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम साजरे होत असतात.
यावेळी देश विदेशातील राजदूत,परदेशातील राष्ट्रपती,पंतप्रधान आणि उच्चपदस्थ अधिकारी हजर राहतात. पण यंदा कोरोना साथीच्या प्रसाराला प्रतिबंध म्हणून कार्यक्रमावर मर्यादा घालण्यात आली आहे.
दरवर्षी २६ जानेवारीला राजपथावर संचलन केले जाते.यंदा या संचलनाची लांबी कमी करण्यात आली आहे.या सोहळ्यात देश विदेशातून कलाकार सामील होत असतात. पण या वेळी सहभागी होणाऱ्यांची संख्या पण कमी करण्यात आली आहे. दरवर्षी या सोहळ्यात जवळपास एक लाख लोक देश विदेशातून सहभागी होत असतात.
पण यावर्षी कोरोना रोगाच्या साथीमुळे ती संख्या २५ हजारावर आणण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार १५ वर्षांच्या खालील मुलांना या सोहळ्यात सहभागी होता येणार नाही.राष्ट्रीय स्तरावरील एनसीसी,सशस्त्र दल आणि निमलष्करी दलाचे जावं या संचलनात सहभागी होत असतात.
जवानांकडून केल्या जाणाऱ्या चित्तथरारक कसरती या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असत. पण यावर्षी त्यांची संख्या पण मर्यादित राहणार आहे. लष्करी जवानांच्या तुकड्यांची संख्या पण मर्यादित राहणार आहे.या तुकड्यांमध्ये फक्त ९६ जणांचाच समावेश राहणार असल्याचे कळवण्यात येतय.