Electric Honda Activa : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यातच इंधनाच्या किमती देखील गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना इंधनावरील वाहने वापरणे परवडत नाही. अशातच आता अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने लॉन्च केली आहेत.
इलेक्ट्रिक वाहने लॉन्च केल्याने सर्वसामान्यांच्या पैशांची बचत होणार आहे. कारण इंधनासाठी दररोज पेट्रोल पंपावर जाण्याची गरज नाही. आता होंडा कंपनीकडून सर्वाधिक लोकप्रिय असलेली ॲक्टिव्हा स्कूटर देखील इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लॉन्च केली जाणार आहे.
होंडा कंपनीच्या अनेक स्कूटर आणि बाईक्स अधिक लोकप्रिय आहेत. कंपनीची ॲक्टिव्हा ही स्कूटर सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. आता तीच स्कूटर कंपनीकडून इलेक्ट्रिक रूपात लॉन्च केली जाणार आहे.
होंडा कंपनीकडून भारतामध्ये पहिलीच इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली जाणारा आहे. त्यासाठी कंपनीकडून होंडा अॅक्टिवा या स्कूटरची निवड करण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची अनेक ग्राहक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत.
ॲक्टिव्हा या पेट्रोल वरील स्कूटरचा भारतात सर्वाधिक खप आहे. त्यामुळे कंपनीकडून हीच स्कूटर इलेक्ट्रिकमध्ये लॉन्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच याबाबत कंपनीकडून माहिती स्पष्ट केली जाऊ शकते.
नवीन होंडा इलेक्ट्रिक स्कूटरचा हा टॉप स्पीड
होंडा कंपनीकडून २९ मार्चपर्यंत ॲक्टिव्हा ही स्कूटर भारतामध्ये लॉन्च केली जाणारा आहे. या स्कूटरमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीकडून या इलेक्ट्रिक स्कूटरला टॉप स्पीड 50 किलोमीटर प्रतितास देण्यात आला आहे.
पेट्रोल व्हर्जनपेक्षा इलेक्ट्रिक ॲक्टिव्हा व्हर्जनमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स कंपनीकडून देण्यात आले आहेत. कंपनीचा दावा आहे की या इलेक्ट्रिक स्कूटरला भारतामध्ये सर्वाधिक पसंती मिळेल.
किंमत
या स्कूटरच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, तर त्याचे डिझाईन पूर्वीप्रमाणेच वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल. होंडाच्या या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत सुमारे 1 लाख ते 1 लाख 25 हजार रुपयांच्या आसपास असेल.
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर जर एकदा चार्ज केली तर ती १०० किलोमीटरपर्यंत धावू शकेल असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.