EPF withdrawal News : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी किंवा EPF ही एक कर्मचाऱ्यांसाठी पैसे गुंतवणूक करण्याची चांगली बचत योजना आहे. या योजनेमध्ये भारतातील लाखो लोक पैसे गुंतवणूक करत असतात. यामधील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेमध्ये कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही कर्मचार्यांच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या 12 टक्के EPF मध्ये योगदान देतात. सध्या EPF च्या गुंतवणुकीवर वार्षिक ८.१ टक्के व्याजदर दिले जात आहे.
मात्र अनेकदा काही कर्मचाऱ्यांच्या EPF गुंतवणुकीला नॉमिनी केलेला नसतो. त्यामुळे जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्यावरील पैसे काढण्यास समस्या निर्माण होतात. त्यामुळे नॉमिनी असणे आवश्यक असते.
नॉमिनी म्हणजे EPF कर्मचाऱ्यांच्या गुंतवणुकीला वारासदाराची नोंद करणे. कारण वारासदाराची नोंद केल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास हे पैसे त्या वारसदाराला दिले जातात. तसेच जो व्यक्ती नॉमिनी आहे तो व्यक्ती सहज पैसे काढू शकतो.
EPF सदस्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या या योजनेतील पैसे त्याच्या कुटुंबास मिळत असतात. हे पैसे जो व्यक्ती नॉमिनी आहे तोच व्यक्ती काढू शकतो. जर नॉमिनी अल्पवयीन असेल तर त्याच्या कुटुंबातील व्यक्ती ते पैसे काढू शकतात.
नॉमिनी नसेल तर ईपीएफ सदस्याच्या मृत्यूनंतर पैसे कसे काढायचे
सदस्य आणि दावेदार यांच्या आवश्यक तपशीलांसह EPF फॉर्म 20 भरा.
फॉर्म सबमिशन केल्यानंतर, दावेदारांना त्यांच्या दावा फॉर्मच्या मंजुरीच्या विविध टप्प्यांवर एसएमएस अलर्ट प्राप्त होतील. स्टेटस तपासण्यासाठी दावेदार ईपीएफओच्या वेबसाइटलाही भेट देऊ शकतात.
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दावेदाराला रक्कम मिळेल. दावेदाराने नमूद केलेल्या बँक खात्यात थेट जमा करून पेमेंट केले जाते.
हे लक्षात ठेवा
अर्ज ज्या नियोक्त्याच्या अंतर्गत सदस्याने शेवटचा काम केला होता त्या नियोक्त्यामार्फत सबमिट केला जावा. जर दावा EPFIndia वेबसाइटवरून डाउनलोड केलेल्या फॉर्मद्वारे केला गेला असेल, तर सर्व पृष्ठांवर दावेदाराची तसेच नियोक्त्याची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.