EPFO : नोकरी करत असताना अनेक नोकरदारांचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून पीएफ म्हणून काही रक्कम कापली जाते. जर तसेच काही जण या योजनेमध्ये पैशांची गुंतवणूक करत असतात. पण पैशांची गुंतवणूक करत असताना त्याच्या गुंतवणुकीचा काही कालावधी ठरलेला असतो.
जर तुम्ही पीएफमध्ये पैसे गुंतवणूक केले आणि तुम्हाला पैसे गुंतवणूक केल्याच्या अगोदरच तुम्हाला पैसे काढायचे असतील तर तुम्हाला ते पैसे सहजासहजी दिले जात नाहीत. त्यासाठी तुम्हाला एक काम करावे लागेल.
पीएफमध्ये तुम्ही वर्षातून किमान ५०० किंवा कमाल १.५ लाख रुपये गुंतवणूक करू शकता. यापेक्षा कमी किंवा जास्त पैसे तुम्ही यामध्ये गुंतवू शकत नाही. जर तुम्हाला कर वाचवायचा असेल तर तुमच्यासाठी पीएफमध्ये पैसे गुंतवणे हा एक चांगला मार्ग आहे.
भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्याचे नियम
पीएफमधील पैसे काढण्यासाठी देखील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून काही नियम बनवण्यात आले आहेत. पीएफमधील पैसे हे निवृत्त कर्मचारीच काढू शकतात. मात्र जर इतर गुंतवणूकदारांना पैसे काढायचे असतील तर त्यांना काही अटी पाळाव्या लागतात.
1. बेरोजगारीच्या वेळ आल्यानंतर
जर एखाद्या पीएफ गुंतवणूकदारावर बेरोजगाराची वेळ आली तर ते यामधून पैसे काढू शकतात. एखादी व्यक्ती बेरोजगार झाली आणि एक महिन्यापेक्षा जास्त काळ कोणतेही काम नसेल तर तो संपूर्ण ठेवीपैकी 75% पर्यंत रक्कम घेऊ शकतो. जर दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ बेरोजगारीची वेळ राहिली तर, खातेदार या कलमांतर्गत अतिरिक्त 25% रक्कम काढू शकतो.
2. उच्च शिक्षणासाठी
जर पीएफ खातेधारकाला उच्च शिक्षण घेईचे असेल किंवा मुलांच्या शैक्षणिक कारच भागवायचा असेल तर ते खात्यामधून 50% काढू शकतात. EPF खात्यात किमान 7 वर्षे योगदान दिल्यानंतर, पैसे हस्तांतरित करता येतील.
3. लग्नासाठी
जर पीएफ खातेधारकाला लग्नासाठी पैसे हवे असतील तर तो खात्यामधून 50% पैसे काढू शातो. तसेच मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी देखील पीएफ खातेधारक पैसे काढू शकतात.
4. अपंग लोकांसाठी
पीएफ विथड्रॉल नियम 2023 नुसार, अक्षम खाते धारकांना 6 महिन्यांचा मूळ पगार आणि महागाई भत्ता किंवा कर्मचार्यांचा हिस्सा (जे कमी असेल) व्याजासह काढण्याची परवानगी आहे.
5. वैद्यकीय आवश्यकता
पीएफ किंवा ईपीएफ खातेदार अनेक आजारांसाठी तातडीच्या वैद्यकीय सेवेचा खर्च भागवण्यासाठी त्याच्या ईपीएफ शिल्लकमधून पैसे काढू शकतात. या सुविधेला स्वतःच्या वापरासाठी आणि कुटुंबातील जवळच्या सदस्यांच्या उपचारांसाठी पैसे देण्याची परवानगी आहे. तो सहा महिन्यांचा मूळ पगार, महागाई भत्ता किंवा कर्मचाऱ्यांचा वाटा आणि व्याज यापैकी जे कमी असेल ते काढू शकतो.
6. थकीत कर्ज फेडणे
जर पीएफ खातेधारक कोणतेही थकीत कर्ज असेल आणि ते त्याला भरायचे असेल तर तो पीएफ खात्यामधून पैसे काढू शकतो. काढलेल्या पैशातून कर्ज भागवू शकतात.
7. घर किंवा जमीन खरेदी करणे
जर पीएफ खातेधारकाला जमीन किंवा घर खरेदी करायचे असेल तर पीएफ खातेधारक पीएफ खात्यातून पैसे काढू शकतात. तसेच घर दुरुस्तीसाठी देखील पैसे काढण्याची मुभा खातेधारकांना दिली जाते.