भारत

Fake Currency : तुमच्याकडील नोटा बनावट तर नाहीत ना? अशा ओळखा बनावट नोटा, सापडल्या तर करा हे काम…

Fake Currency : बाजारात अनेकदा बनावट नोटा आढळत असतात. अनेकदा आपण आर्थिक व्यवहार करत असताना चुकून आपल्याकडे देखील बनावट नोटा येतात. मग या बनावट नोटा आल्यानंतर काय करावे अनेक लोकांना माहिती नसते. भारतात बनावट नोटा सोबत बाळगणे गुन्हा मानले जाते.

त्यामुळे आर्थिक व्यवहार करत असताना काळजी घेणे गरजेचे आहे. तुमच्याकडे असणाऱ्या नोटा बनावट आहे की खऱ्या आहेत हे तुम्हाला देखील माहिती नसते. त्यासाठी तुम्ही नोटांवर अनेक चिन्हे किंवा इतर गोष्टी पाहून नोटा खऱ्या आहेत की नाहीत हे तपासू शकता.

वॉटरमार्क पहा

अनेकदा नकली नोटा आल्या तर आर्थिक नुकसान होते. त्यामुळे कधीही इतरांकडून नोटा घेत असताना त्यावरील वॉटरमार्क पहा. हा वॉटरमार्क उजेडात नोट पकडल्यानंतर लगेच दिसून येतो. वॉटरमार्क हे महात्मा गांधींचे पोर्ट्रेट आहे आणि नोटेच्या डाव्या बाजूला दिसते.

सुरक्षा धागा तपासा

भारतीय नोटमध्ये तुम्हाला एक सोनेरी कलरची उभी पट्टी दिसेल. या पट्टीवर RBI लिहलेले असते. जर तुमच्याकडील नोटेवर असे नसेल तर ती बनावट नोट असेल. त्यामुळे नोटा घेताना काळजीपूर्वक घ्या.

मुद्रण गुणवत्ता तपासा

भारतीय नोटा या उत्तम दरवाजाच्या आहेत. त्यांची छपाई रेषांमध्ये केली जाते. जर तुमच्याकडील नोटा उत्तम दरवाजाच्या नसतील त्या खोट्या आहेत. हे तुम्ही बँकेमध्ये जाऊन देखील तपासू शकता.

सी-थ्रू रजिस्टर तपासा

सर्व भारतीय चलनी नोटांमध्ये एक सी-थ्रू रजिस्टर असते, नोटेच्या मूल्याची एक प्रतिमा, नोटेच्या पुढील आणि मागील बाजूस छापलेली असते, जी प्रकाशापुढे पकडल्यास उत्तम प्रकारे संरेखित होते.

सूक्ष्म-अक्षर तपासा

भारतीय चलनातील नोटमध्ये अनेक विशेष अक्षरे किंवा अंक असतात. त्याद्वारे तुम्ही नोटा खऱ्या आहेत की बनावट आहेत ते तपासू शकता. खऱ्या नोटांवर अशी अक्षरे स्पष्ट आणि लहान असतात पण खोट्या नोटांवर अशी अक्षरे अस्पष्ट असतात.

पेपर तपासा

भारतीय चलनाच्या नोटा या उच्च दरवाजाच्या पेपवर छापल्या जातात. या नोटांचा कागद एक विशिष्ट प्रकारचा असतो. जो तुम्हाला बनावट नोटेमध्ये आढळणार नाही. तसेच खऱ्या नोटांमधील कागद हा कुरकुरीत असतो.

अनुक्रमांक तपासा

भारतीय चलनी नोटांवर देखील एक अद्वितीय अनुक्रमांक मुद्रित केलेला असतो, त्यामुळे नोटेच्या दोन्ही बाजूंचा अनुक्रमांक सारखाच आहे आणि बाजूच्या पॅनलवर छापलेल्या अनुक्रमांकाशी देखील जुळतो याची खात्री करणे आवश्यक आहे.

बनावट नोट सापडल्यास काय करावे?

भारतीय चालनामध्ये अनके बनावट नोटा पसरल्या आहेत. अश्या बनावट नोटा आर्थिक व्यवहारातून बाद करण्यासाठी तसेच बनावट नोटांचे प्रकार थांबवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक अनेक उपायोजना करत आहे.

जर तुम्हालाही बनावट नोटा सापडल्या तर विलंब न करता बँकेतील अधिकाऱ्यांना कळवू शकता. भारतामध्ये बनावट नोटा ठेवणे किंवा त्यांचा व्यवहार करणे फौजदारी गुन्हा मानला जातो. जर तुम्हाला तुमच्या नोटांबद्दल शंका असेल तर तुम्ही त्या नोटा बँकेमध्ये नेऊन खात्री करू शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts