भारत

परिवार चहा आता सगळ्यांच्या बजेटमध्ये ! जास्तीत जास्त चहाप्रेमींना या चहाचा आस्वाद घेता येणार

India News : आपला देश पारतंत्र्यात असल्यापासून ते आजतागायत गेली १२५ वर्षांपासून भारतीय चहाची परंपरा जपण्याचे व माफक दरात दर्जेदार चहा पुरवण्याचे काम ‘सपट’ अविरत करत आहे.

भारतात पावलोपावली भाषा व चालीरीती आणि खाण्या- पिण्याच्या आवडीनिवडी बदलतात. या सर्वांचा विचार करून सपटने प्रत्येकाच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांना आवडेल अशा चहा बँडचे उत्पादन व पुरवठा नेहमीच केला आहे. म्हणूनच तर महाराष्ट्रातील प्रमुख चहा कंपन्यांमध्ये सपटचा उल्लेख केला जातो.

परिवार चहा हा असाच एक उत्तम व दर्जेदार असा चहा असून खास निवडक अशा पाच प्रकारच्या चहापत्तींपासून बनवलेला हा चहा लोकांच्या पसंतीस उतरलेला आहे. अनेक दिग्गज लोकांनी या चहाला पसंती दर्शवलेली असून या चहाचा मनमुराद आस्वादही घेतलेला आहे.

सपटने ग्राहकांच्या फायद्याचा नेहमीच विचार केलेला असून नेहमीच वेगवेगळ्या ऑफर जसे, सोना-चांदी ऑफर, पैठणी ऑफर, दुचाकी व चारचाकी जिंकण्याची ऑफर या अशा कितीतरी ऑफर देऊन ग्राहकांचे हित व खिसा जपण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते.

आपले महिन्याचे बजेट विस्कटून न देता जास्तीत जास्त लोकांना परिवार चहाचा आस्वाद घेता यावा व जेवढा आवश्यक असेल तेवढाच चहा खरेदी करता येण्यासाठी सपटने परिवार चहाचा रुपये १०० किंमतीचा २०० ग्रॅमचा बजेटवाला पॅक बाजारात आणला आहे. जेणेकरून जास्तीत जास्त चहाप्रेमींना या चहाचा आस्वाद घेता येणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: India news

Recent Posts