भारत

Famous Waterfalls in India : पावसाळ्यात भारतातील या प्रसिद्ध धबधब्यांना नक्की द्या भेट, मनमोहक सौंदर्य पाहण्यासाठी लाखो लोक करतात गर्दी

Famous Waterfalls in India : देशभरात सध्या पावसाळा सुरु आहे. त्यामुळे अनेकजण पावसाळ्यात पर्यटन स्थळांना भेट देत असतात. पावसाळ्यात जर तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर हिल स्टेशनच्या ठिकाणी फिरायला जाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

पावसाळ्यात हिल स्टेशनच्या ठिकाणी तुम्हाला नैसर्गिक सौंदर्य आणि आल्हाददायक वातावरण पाहायला मिळेल. तसेच अशा ठिकाणी तुम्हाला अनेक उंचच्या उंच धबधबे पाहायला मिळतील. या पावसाळ्यात तुम्ही देखील भारतातील प्रसिद्ध धबधब्यांना भेट देऊन तुमच्या सहलीचा आनंद वाढवू शकता.

नोहकालिकाई फॉल्स, मेघालय

नोहकालिकाई फॉल्स हा एक भारतातील प्रसिद्ध धबधब्यांपैकी एक आहे. भारतातील हा सर्वात उंच धबधबा आहे. 700 मीटर उंचीवरून हा धबधबा खाली कोसळतो. त्यामुळे हे दृश्य पाहण्यासाठी लाखो पर्यटक या ठिकाणी येत असतात.

नुरानंग फॉल्स, अरुणाचल प्रदेश

अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात देखील एक प्रसिद्ध धबधबा आहे. नुरानंग फॉल्स असे या धबधब्याचे नाव आहे. हा धबधबा 100 मीटर उंचीवरून खाली कोसळतो. त्यामुळे हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी लाखो पर्यटक दरवषी भेट देत असतात.

धुंधर धबधबा, मध्य प्रदेश

मध्य प्रदेशातील जबलपूरजवळ एक मोठा धबधबा आहे. धुंधर धबधबा असे त्याचे नाव असून तो 300 मीटर उंचीवरून म्हणजेच सुमारे 1,000 फुटांवरून कोसळतो. हा धबधबा दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करत असतो.

चित्रकूट फॉल्स, छत्तीसगड

चित्रकूट फॉल्स छत्तीसगडच्या जगदलपूर जिल्ह्यात आहे. हा धबधबा नैसर्गिक हिरव्यागार दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. या धबधब्याची उंची ९५ मीटर आहे. या धबधब्याचे उंचीवरून पडणारे फेसाळ आणि पाहण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी गर्दी करत असतात.

होगेनक्कल फॉल्स, तमिळनाडू 

हा धबधबा तामिळनाडू आणि कर्नाटकच्या सीमेवर कावेरी नदीवर आहे. हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे आणि सुंदर दृश्ये आणि ताजे पाणी यासाठी ओळखले जाते. तुम्ही या ठिकाणी भेट देऊन पर्यटनाचा आनंद घेऊ शकता.

इरुपू फॉल्स, कर्नाटक

कर्नाटकातील कूर्ग जिल्ह्यात इरुपू फॉल्स नावाचा प्रसिद्ध धबधबा आहे. विस्मयकारक सौंदर्यासाठी हा धबधबा ओळखला जातो. या धबधब्याची उंची 253 मीटर आहे. तसेच हा धबधबा हिरव्यागार जंगलांनी वेढलेला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts