LIC Scheme : देशातील मुलींसाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजना भारतीय सरकारी विमा कंपनी एलआयसीद्वारे राबवल्या जातात. एलआयसीने मुलींसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून चांगला मोबदला मिळवू शकतात.
आजकाल अनेकांना मुलींच्या भविष्याची चिंता लागून राहिलेली असते. मात्र आता मुलींच्या भविष्याची चिंता करण्याची गरज नाही. कारण आता मुलीच्या भवितव्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे.
एलआयसीकडून मुलींसाठी कन्यादान योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही मुलींच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी हे पैसे वापरू शकता. कमी गुंतवणुकीत अधिक नफा या योजनेतून होत आहे.
एलआयसी योजनेचा कालावधी कधी पूर्ण होतो?
कन्यादान योजनेत तुम्हाला काही पैसे गुंतवावे लागतील. तुम्हाला या योजनेत मुलगी लहान असतानाच गुंतवणूक करावी लागेल. ही गुंतवणूक मुलीच्या वयाच्या 22 वर्षापर्यंत करावी लागेल. या योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला परतावा म्हणून २६ लाख रुपये मिळतील.
या योजनेमुळे मुलींचे भविष्य उज्वल होईल. तसेच पुढील शिक्षण किंवा लग्नासाठी आता पालकांना मुलींची चिंता करावी लागणार नाही. योजनेसाठी काही अति आणि नियम देण्यात आले आहेत त्यांचे तुम्हाला पालन करावे लागेल.
पॉलिसी
तुम्हालाही LIC योजनेतून मिळालेल्या पैशाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही अटींचे पालन करावे लागेल. तुमच्या माहितीसाठी, सांगतो की, LIC पॉलिसीमध्ये सहभागी होण्यासाठी वय किमान 13 ते 25 वर्षे असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही खाली दिलेल्या अटींचे पालन केले तर तुम्हीही तुमच्या मुलीचे उज्ज्वल भविष्याचे स्वप्न साकार करू शकता.
एलआयसी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मुलीचे वय अंदाजे 1 ते 10 वर्षे आणि तिच्या वडिलांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 50 वर्षे असणे आवश्यक आहे.
यासह, परिपक्वतेचे कमाल वय 65 वर्षे असणे आवश्यक आहे.
जर तुम्ही प्रीमियम भरला तर तुम्ही ते मासिक, त्रैमासिक, सहामाही, वार्षिक आधारावर करू शकता.
मासिक हफ्ता किती भरावा लागेल?
LIC योजना (कन्यादान योजना) अंतर्गत तुम्हाला दरमहा 3600 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
यामध्ये तुम्ही कमी प्रीमियम आणि उच्च प्रीमियम योजना खरेदी करू शकता आणि तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता.
मॅच्युरिटीवरील सम अॅश्युअर्ड सोबत, तुम्ही येथे साध्या रिव्हिजनरी बोनसचा लाभ देखील मिळवू शकता.
यासोबतच तुम्ही ही पॉलिसी खरेदी केल्यानंतर ३ वर्षांनी कर्जही घेऊ शकता.