भारत

PM Kisan 13th installment : शेतकऱ्यांनो १३व्या हफ्त्याचे पैसे या कारणामुळे अडकणार, पहा यादीत तुमचे नाव

PM Kisan 13th installment : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना केंद्र सरकार शेतीसाठी आर्थिक मदत म्हणून पैसे देते. आतापर्यंत सरकारकडून १२ हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.

मात्र १३ वा हफ्ता अजूनही शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे देशभरातील लाभार्थी शेतकरी १३व्या हफ्त्याची वाट पाहत आहेत. होळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात १३व्या हफ्त्याचे पैसे सरकारकडून जमा केले जाऊ शकतात.

पुढील महिन्यातील ८ मार्चला होळी आहे आणि शेतकऱ्यांची होळी गोड करण्यासाठी केंद्र सरकार १३व्या हफ्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू शकते. मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे येणार नाहीत.

देशभरातील 10 कोटींहून अधिक अल्पभूधारक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ दिला जातो. आता लवकरच १३वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाण्याची शक्यता आहे. यासाठीची पूर्ण तयारी केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे.

मटार काही शेतकऱ्यांना आता १३व्या हफ्त्याचे पैसे मिळणार नाहीत. यामागील कारण असे की केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यास सांगितले होते मात्र अद्यापही शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही. अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत.

सरकारने पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे. अधिकृत वेबसाइटनुसार, ‘पीएमकिसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. OTP आधारित eKYC PMKisan पोर्टलवर उपलब्ध आहे. किंवा बायोमेट्रिक आधारित eKYC साठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधला जाऊ शकतो.

असे ई-केवायसी करा

सर्वप्रथम, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाइटला pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

पृष्ठावरील ई-केवायसी वर क्लिक करा.

यानंतर एक नवीन पेज उघडेल. आधार क्रमांक टाका आणि शोधा.

यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल.

पेजवर OTP टाकून सबमिट करा.

आधार नोंदणीकृत मोबाइल ओटीपी प्रविष्ट करा आणि तुमचे ई-केवायसी केले जाईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts