भारत

Kisan Credit Card : शेतकऱ्यांनो आता सावकारी कर्ज विसरा! मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार पैसे…

Kisan Credit Card : देशातील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. देशातील शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी मोदी सरकार अनेक योजना राबवून प्रयत्न करत आहे. आता मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज दिले जात आहे.

किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून कमी व्याजदरात कर्ज दिले जात आहे. तुम्हीही शेतकरी असाल आणि तुम्हाला पैशाची गरज आहे तर जवळच्या बँकेमध्ये जाऊन किसान क्रेडिट कार्डवरून तुम्ही कमी व्याजदरात कर्ज मिळवू शकता.

कमी व्याजदरात किसान क्रेडिट कार्डवर कर्ज उपलब्ध

शेती करत असताना शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागते. पैसे नसल्याने शेतकरी सावकाराकडून कर्ज घेतो. हे कर्ज पुन्हा फेडता येत नाही म्हणून अनेक शेतकरी आत्महत्या करतात.

मात्र आता शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज घेईची गरज नाही. कारण आता केंद्र सरकारकडून सर्वात कमी व्याजदरात शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डवरून कर्ज दिले जात आहे.

केंद्र सरकारच्या या योजनेचा थेट शेतकऱ्यांना फायदा होत आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा चांगला लाभ होत आहे. शेतकरी जवळच्या बँकेमध्ये जाऊन आवश्यकतेनुसार कर्ज मिळवू शकतात.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची आर्थिक मदत मिळावी यासाठी “किसान क्रेडिट कार्ड योजना” सुरू केली आहे. प्रजासत्ताक दिनादिवशी नरेंद्र मोदी यांनी या योजनेच्या कर्जावरील व्याजदर कमी करण्याची घोषणा केली आहे.

तुम्हाला नवीन किसान क्रेडिट कार्ड हवे असल्यास पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. यामध्ये तुम्हाला काही माहिती भरावी लागेल आणि काही कागदपत्रे सादर करावी लागतील.

जवळच्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही ही कागदपत्रे जमा करू शकता. काही दिवसानानंतर तुम्हाला तुमचे किसान क्रेडिट कार्ड दिलेल्या पत्त्यावर घरपोच होईल. त्यानंतर तुम्ही बँकेतून या कार्डद्वारे पैसे काढू शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts