भारत

Gautam Adani Lifestyle : गौतम अदानी यांचा बंगला आहे तब्बल इतक्या कोटींचा! किंमत जाणून तुमचेही फिरतील डोळे, पहा त्यांची लक्झरी लाइफस्टाइल

Gautam Adani Lifestyle : भारताचे अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या मोठमोठ्या उद्योगांबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे. पण त्यांच्या जीवनशैलीबद्दल अगदी बोटावर मोजण्याइतक्याच लोकांना माहिती आहे. गौतम अदानी यांची तुलना आशियातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांपैकी एक म्हणून केली जाते.

गौतम अदानी हे त्यांच्या व्यवसायामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. आज तुम्हाला त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइलबद्दल सांगणार आहोत. त्यांच्याकडे अनेक अशा महागड्या वस्तू आहेत त्यांची किंमत पाहून तुमचेही डोळे फिरतील.

अशी आहे गौतम अदानी जीवनशैली

गुजरातमधील अहमदाबाद येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये गौतम अदानी यांचा 24 जून 1962 रोजी जन्म झाला आहे. त्यांचे व्यवसाय देशातच नाही तर जगभरात पसरलेले आहेत. कोळसा, उर्जा, लॉजिस्टिक, कृषी उत्पादने, रिअल इस्टेट आणि तेल यासारख्या क्षेत्रांमध्ये त्यांच्या कंपनी काम करत आहेत. त्यांच्या कंपन्या दरवर्षी करोडोंचा व्यवसाय करतात.

गौतम अदानी यांचे ४०० कोटींचे घर

गौतम अदानी यांनी कमी कालावधीमध्ये त्यांचे व्यवसाय जगभरात पोहोचवले आहेत. त्यांनी सुरुवातीला अहमदाबाद सोडून मुंबई गाठली आणि सुरुवातीला हिऱ्यांच्या ब्रोकरेजमध्ये कामकाजाला सुरुवात केली.

त्यांना या व्यवसायामध्ये करोडोंचा फायदा झाला. गौतम अदानी यांचे घर तब्बल 3.4 एकरमध्ये पसरलेले आहे. त्याची किंमत ४०० कोटींच्या घरात आहे. या घरामध्ये खूप महागड्या वस्तू आहेत.

खाजगी विमान

गौतम अदानी यांच्याकडे इतकी टोलेजंग संपत्ती आहे त्यामुळे त्यांच्या खाजगी विमात तर असणारच. गौतम अदानी यांच्याकडे एकूण ३ खाजगी जेट आहेत. देश-विदेशात जाण्यासाठी अदानी हे या खाजगी जेटचा वापर करतात.

त्याच्या जेट कलेक्शनमध्ये हॉकर, बीच क्राफ्ट आणि बॉम्बेडियर यांचा समावेश आहे. ही सर्व जेट विमाने आतून लक्झरी सुविधांनी सुसज्ज आहेत आणि त्यात संपूर्ण आलिशान बंगला राहतो.

त्यांनी 2005 मध्ये बीच क्राफ्ट आणि 2008 मध्ये हॉकर खरेदी केली. याशिवाय त्यांच्याकडे तीन हेलिकॉप्टर आहेत. ज्यामध्ये ट्विन इंजिन, 15 सीटर आणि AgustaWestland AW 139 समाविष्ट आहे. या सर्वांवर कोट्यवधी रुपये खर्च आला.

अदानी यांच्या महागड्या कार

गौतम अदानी यांनी सर्वात प्रथम 1977 मध्ये पहिली स्कूटर खरेदी केली होती. त्यानंतर त्यांचे नशीब पलटले आणि आज ते BMW 7 सिरीजसहा अनेक महागड्या गाड्यांमध्ये प्रवास करतात. त्यांच्याकडे ३ कोटींपासून ते ५ कोटींपर्यंत महागड्या कारचे कलेक्शन आहे.

रमी खेळण्याची आवड आहे

अदानी समूह इतका मोठा असला तरीही गौतम अदानी हे कुटुंबाला नेहमी वेळ देत असतात. गौतम अदानी आणि त्यांची पत्नी आठवड्यातून तीन ते चार वेळा रमी गेम खेळत असतात.

गुजराती जेवण

गौतम अदानी यांना शुद्ध शाकाहारी जेवण आवडते. गुजरातमधील अहमदाबाद येथील असल्याने त्यांना गुजराती जेवण खूप आवडते. जरी अदानी हे कुटुंबाबासोबत फिरायला गेले तरी ते गुजराती जेवणच खाण्यास पसंती देतात.

गौतम अदानी यांना कुटुंबासोबत फिरायला आवडते. त्यामुळे ते अनेकदा कुटुंबासोबत फिरायला जात असतात. स्वित्झर्लंड हे त्याच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे

धीरूभाई अंबानी हे आदर्श आहेत

गौतम स्वतः इतके मोठे उद्योगपती आहेत, तरीही ते रिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानींना आपला आदर्श मानतात. ते अनेकदा त्यांच्याबद्दल वाचतात आणि अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts