Steel and Cement Price : घर बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किंमती काही दिवसांपूर्वी गगनाला भिडल्या होत्या. मात्र आता त्याच साहित्याच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे कमी बजेट असणाऱ्यांना घर बांधण्याची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
सध्या देशात महागाई वाढत चालली आहे. इंधनाच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम सर्वच वस्तूंवर झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये घर बांधणे अवघड झाले होते. मात्र काही दिवसांपासून स्टील आणि सिमेंटच्या किमती कमी होत आहेत.
घर बांधण्यासाठी स्टील आणि सिमेंट या दोन वस्तू खूप महत्वाच्या आहेत. सध्या त्यांच्या किमती कमी झाल्याने कमी दरात स्टील आणि सिमेंट खरेदी करून ग्राहक पैसे वाचवू शकतात.
प्रत्येकाचे छोटे का होईना स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न असते. पण वाढत्या महागाईत ते घर बांधणे अनेकांना अशक्य आहे. पण जर स्वप्नातील घर पूर्ण करायचे असेल तर आता चांगली संधी मानली जात आहे.
घर बांधण्यासाठी अनेक वस्तूंची गरज असते. फक्त स्टील आणि सिमेंटमध्येच घर पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी विटा, वाळू आणि इतर गोष्टी देखील लागतात. मात्र ते साहित्य सुद्धा सध्या स्वस्त झाले आहे.
जर तुमचे घर बांधण्यासाठी कमी बजेट आहे तर सध्या तुम्ही त्या बजेटमध्ये घर पूर्ण करू शकता. स्टील आणि सिमेंट खरेदी करताना तुमचे मोठे पैसे वाचतील आणि तेच पैसे इतर साहित्य खरेदी करण्यासाठी तुम्ही वापरू शकता.
स्टील आणि सिमेंटचे दर दिवसेंदिवस बदलत असतात. सध्या स्टील आणि सिमेंटच्या दरात चढ उतार सुरु आहे. सध्या स्टील आणि सिमेंटच्या मागणीत घट झाल्याने दरही कोसळले आहेत.
मात्र लवकरच स्टील आणि सिमेंटच्या मागणीत वाढ होऊ शकते. कारण उन्हाळ्यामध्ये बांधकाम क्षेत्रात कामाला तेजी येते आणि घर बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या मागणीत देखील वाढ होते त्यामुळे दरही वाढतात.
प्रमुख शहरातील स्टीलच्या किंमती
मुंबई महाराष्ट्र TMT 12mm 56000 रुपये प्रति टन 27-February-23
नागपूर महाराष्ट्र TMT 12mm 51000 रुपये प्रति टन 27-February-23
जालना महाराष्ट्र TMT 12mm 55300 रुपये प्रति टन 27-February-23
सिमेंटच्या किमती
गेल्या काही दिवसांपासून सिमेंटच्या किमती देखील कमी होत आहेत. सिमेंटच्या किमती देखील २० ते ६० रुपयांपर्यंत घसरल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी ४०० रुपये प्रति बॅग सिमेंटची पिशवी मिळत होती मात्र आता 350 ते 365 रुपये प्रति बॅग सिमेंट उपलब्ध आहे.