MPSC Recruitment : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सरकारच्या विविध आस्थापनेवरील विविध जागा भरल्या अनार आहेत. गट ब आणि गट क संवर्गातील अनेक पदे रिक्त झाल्याने अनेक जागा भरल्या जाणार आहेत. याबाबत एक जाहिरात जारी करण्यात आली आहे.
जर तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज देखील करता येऊ शकतो. भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. जर तुम्हीही अशा नोकरीसाठी इच्छुक असाल तर यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सरकारच्या आस्थापनेवरील विविध 8169 जागा भरण्यात येणार आहेत. या एकूण जागांमध्ये सहायक कक्ष अधिकारी पदांच्या ७८ जागा, राज्य कर निरीक्षक पदांच्या १५९ जागा,
पोलीस उप निरीक्षक पदांच्या ३७४ जागा, दुय्यम निबंधक (मुद्रांक निरीक्षक) पदांच्या ४९ जागा, दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क) पदांच्या ६ जागा, तांत्रिक सहायक पदाची १ जागा, कर सहायक पदांच्या ४६८ जागा आणि लिपिक-टंकलेखक पदाच्या ७०३४ पदांच्या रिक्त भरण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात येणाऱ्या रिक्त जागांसाठी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. वेगवेगळ्या विभागात जागा असल्यामुळे शैक्षणिक पात्रताही वेगळी असणार आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही खालील लिंकला भेट देऊ शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
जर तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून काढण्यात आलेल्या जगासाठी अर्ज करू इच्छित असाल तर लवकरात लवकर करा कारण यासाठी 21 फेब्रुवारी 2023 ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता.
एमपीएससीची अधिकृत वेबसाइट
जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://drive.google.com/file/d/1UjBqY1EDJWps1b7EeSQsXhGTpmQ6oP0t/view