भारत

7th Pay Commission Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! कर्मचाऱ्यांना या दिवशी मिळणार 3 भेटवस्तू

7th Pay Commission Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लवकरच केंद्र सरकार मोठा निर्णय घेऊन गोड बातमी देण्याच्या तयारीत आहे. पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. कारण कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ३ भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे.

डीएमध्ये वाढ, फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ आणि थकबाकी डीएबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. वर्षातून दोन वेळा कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जातो. नवीन वर्ष सुरु झाले आहे. लवकरच कर्मचाऱ्यांच्या पहिला महागाई भत्ता वाढवला जाऊ शकतो.

३१ जानेवारी रोजी केंद्र सरकारकडून देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे. यामध्ये केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

पाठीमागील आकडेवारीचा विचार केला तर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ केली जाण्याची शक्यता आहे. पाठीमागच्या वेळी ४ टक्क्यांनी महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली होती.

कर्मचाऱ्यांना सध्या ३८ टक्के महागाई मिळत आहे. जर ३ टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवण्यात आला तर ४१ टक्के महागाई भत्ता होऊ शकतो. तसेच पगारातही बंपर वाढ होऊ शकते.

1 मार्च 2023 रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. असे झाल्यास ३१ मार्चपासून कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळू शकेल आणि पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन मिळू शकेल. एवढेच नाही तर थकबाकीसह जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे पैसे खात्यात येणार आहेत.

डीए तीन टक्क्यांपर्यंत वाढू शकतो

ज्या प्रकारे महागाईचा आलेख वाढत आहे, त्यावरून नवीन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए हाईक) ३ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. वास्तविक, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा (सातवा वेतन आयोग) दर 6 महिन्यांनी आढावा घेतला जातो.

AICPI आकडेवारीच्या आधारे महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो. एक भाडेवाढ जानेवारीत आणि दुसरी जुलैमध्ये होते. दरवर्षीप्रमाणे 2023 मध्येही केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे.

18 महिन्यांच्या DA थकबाकीबाबत सरकार मोठा निर्णय घेऊ शकते

येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये कर्मचाऱ्यांच्या 18 महिन्यांच्या डीए थकबाकी बाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोना काळापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांची DA थकबाकी आहे.

फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ

त्याचबरोबर केंद्र सरकारच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये सुधारणा करण्याचे प्रकरणही वेगात आहे. फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी केंद्रीय कर्मचारी सातत्याने करत आहेत.

त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सरकार फिटमेंट फॅक्टरमध्ये रिव्हिजन वाढवण्याबाबत मोठी घोषणा करू शकते. फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts