Steel and Cement Price : घर बांधण्यासाठी लागणाऱ्या स्टील आणि सिमेंटच्या भावात घसरण झाली आहे. त्यामुळे घर बाधणाऱ्यांसाठी हीच सुवर्णसंधी मानली जात आहे. कारण घर बांधण्यासाठी ज्या वस्तूंवर जास्त पैसे खर्च केले जातात त्याच वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत.
स्टील सिमेंटचे दर सध्या सामान्य आहेत. त्यामुळे घर बांधण्यासाठी कमी पैसे लागतील. लवकरच उन्हाळ्याचे दिवस सुरु होणार आहेत. या दिवसांत स्टील आणि सिमेंटची मागणी वाढते आणि त्यांचे भावही वाढतात.
कमी बजेट असणाऱ्यांसाठी स्वतःचे स्वप्नातले घर बांधण्याची सुवर्णसंधी आहे. स्टील आणि सिमेंट कमी दरात उपलब्ध असल्याने कमी खर्चात घर पूर्ण होऊ शकते. बांधकाम क्षेत्रात तेजी आल्यानंतर घर बांधण्यासाठी लागणारे सर्वच साहित्य महाग होते.
केंद्र सरकार देशातील ज्या नागरिकांना राहण्यासाठी अजूनही पक्की घरे घरे नाहीत अशा लोकांना घरकुल योजनेतून पैसे देत आहे. मात्र या पैशातून घर पूर्ण होणे शक्य नसते. मात्र जर तुम्ही अशा परिस्थिती घर बांधले तर तुमच्याकडील थोडे पैसे टाकून तुम्ही घर बांधू शकता.
स्टील आणि सिमेंटच्या किमती वाढल्या तर अनेकांचे घर बांधण्याचे बजेट कोलमडते. त्यामुळे सध्या स्वस्त दरात तुम्ही स्टील आणि सिमेंट खरेदी करून ठेऊ शकता.
स्टील आणि सिमेंटची नवीन किंमत
आज सर्या स्टीलच्या किमतीत बरीच घट झाली आहे. सध्या स्टीलचा दर महाराष्ट्रात 63,800 प्रति टन आणि भोपाळ, मध्य प्रदेशात 65,100 च्या आसपास आहे. सध्याचे दर हे सामान्य स्थितीत आहेत.
सिमेंटच्या एका पोत्याचा दर 330 ते 410 रुपयांच्या आसपास आहे. भोपाळमध्ये, अल्ट्राट्रॅक सिमेंटचा दर 410 ते 430 रुपये आहे, आणि एसीसी सिमेंटचा दर 330 ते 370 रुपये प्रति बॅग आहे.