भारत

Ration Card News : रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी ! आता मिळणार दुप्पट रेशन

Ration Card News : रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सरकारकडून आता रेशनकार्डधारकांना दुप्पट रेशन दिले जाणार आहे. सरकारकडून सतत रेशनकार्ड नियमांमध्ये बदल केले जात आहेत. तसेच मोदी सरकारकडून मोफत धान्य वाटप करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.

राज्य सरकारकारकडून शिधापत्रिकाधारकांना मोठे गिफ्ट देण्यात आले आहे. राज्य सरकारने रेशन कार्ड धारकांना दुप्पट रेशन देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता दुप्पट रेशन मिळणार आहे.

सरकारने ज्या नागरिकांचे पिवळे रेशन कार्ड आहे त्यांना दुप्पट रेशन देण्याची घोषणा केली आहे. अर्थसंकल्पामध्ये मोफत धान्य देण्याची मुदत १ वर्षाने वाढवण्यात येत असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.

दुप्पट रेशन योजना?

हरियाणा सरकारने 1 जानेवारी 2023 पासून नवीन शिधापत्रिका बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी सरकारने काही पात्रता ठेवली आहे, जर तुम्ही त्या पात्रतेचे पालन केले तरच तुमचे रेशन कार्ड बनवता येईल. राज्यातील बीपीएल शिधापत्रिका मिळविण्यासाठी उमेदवार दारिद्र्यरेषेखालील असणे आवश्यक आहे. उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹ 1.80 लाखांपेक्षा कमी असावे.

पंतप्रधान गरीब कल्याण योजना केंद्र सरकारने एप्रिल 2020 मध्ये कोरोनाच्या काळात सुरू केली होती. या योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना प्रति व्यक्ती ५ किलो रेशन मोफत दिले जाणार आहे.

योजना सुरू केल्यानंतर, ती 7 वेळा वाढविण्यात आली आणि आता अर्थसंकल्प 2023 मध्ये, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 1 वर्षाने वाढवली आहे. 2 लाख कोटी रुपयांच्या या योजनेत होणारा खर्च केंद्र सरकार स्वतः उचलणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts