PM Jan Dhan Yojana : केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांना बँक खाते उघडण्यासाठी पंतप्रधान जनधन योजना सुरु करण्यात आली आहे. २०१४ साली केंद्र सरकारकडून पीएम जनधन योजना सुरु करण्यात आली आहे. देशातील नागरिकांना बँक खाते सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा या योजनेमागील उद्देश होता.
ग्राहक या योजनेद्वारे झिरो बॅलन्सवर खाते काढू शकतात. तुमच्या खात्यावर शून्य रक्कम असली तरीही तुम्हाला कोणताही दंड होणार नाही. मात्र आता जनधन खाते असणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने आता जनधन खात्यावर १० हजार रुपये जमा केले आहेत.
या योजनेद्वारे केंद्र सरकारकडून अनेक सुविधा पुरवल्या जात आहेत. गरीब नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून ही योजना सुरु करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ही योजना सुरु करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकने एकूण 42.7 कोटी बँक खाती उघडली आहेत. ज्या नागरिकांनी जनधन योजनेअंतर्गत बँक खाती उघडली आहेत अशा नागरिकांना सरकारकडून अनेक फायदे दिले जात आहेत.
सरकार जन धन खातेधारकांना ओव्हरड्राफ्ट सुविधा देखील प्रदान करते, ज्या अंतर्गत खातेदाराला 10,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळतो. त्यामुळे जनधन खातेधारकांना चांगला फायदा होत आहे.
जनधन योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये
पीएम जन धन योजनेअंतर्गत तुम्ही देशातील कोणत्याही बँकेत तुमचे जन धन खाते उघडू शकता.
जन धन योजनेअंतर्गत उघडलेले खाते हे शून्य शिल्लक खाते आहे, ज्यामध्ये किमान रक्कम ठेवण्याची गरज नाही.
या योजनेंतर्गत सरकारकडून जनधन खातेदारांना वेळोवेळी विविध प्रकारची आर्थिक मदत दिली जाते, त्यातील रक्कम थेट खातेदारांच्या बँक खात्यात डीपीटीद्वारे हस्तांतरित केली जाते.
प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत खाते उघडणाऱ्या नागरिकाला सरकारकडून 100000 रुपयांचा अपघात विमा संरक्षण दिले जाते.
पीएम जन धन योजनेअंतर्गत उघडलेल्या बँक खात्यांमध्ये तुम्हाला सर्वात कमी व्याजदरात कर्ज मिळू शकते.
जन धन खातेधारकांना ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते ज्यामध्ये तुम्हाला 10000 रुपयांचा लाभ मिळतो.
जन धन योजनेसाठी अर्ज कसा करावा?
पीएम जन धन योजनेअंतर्गत बँक खाते उघडण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेला भेट द्या.
यानंतर, बँक व्यवस्थापकाकडून प्रधानमंत्री जन धन योजनेची संपूर्ण माहिती मिळवा.
जन धन योजनेचे सर्व तपशील समजून घेतल्यानंतर, बँक व्यवस्थापकाकडून अर्ज मिळवा.
दिलेल्या अर्जात सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
अर्जामध्ये विचारलेल्या सर्व कागदपत्रांची प्रत अर्जासोबत जोडावी.
यानंतर, सर्व तपशील आणि कागदपत्रे जोडल्यानंतर, अर्जाचा फॉर्म बँक कर्मचाऱ्याला द्या.
अशा प्रकारे तुमचे जन धन खाते बँक कर्मचारी उघडेल आणि तुम्हाला बँकेकडून खात्याचे पासबुक जारी केले जाईल.