Indian Railways :भारतीय रेल्वे ही दळणवळणाचे मोठे साधन आहे. भारतीय रेल्वेचे जाळे देशातील कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. तसेच कमी खर्चात आरामदायी प्रवास रेलवेने करता येत आहे. भारतीय रेल्वेकडून अनेकदा ग्राहकांना सण-महोत्सवावर अधिक रेल्वे देखील सोडल्या जातात.
मात्र आता भारतीय रेलवेने एक छान उपक्रम राबवला आहे. रेल्वेतून आता मोफत प्रवास करता येणार आहे. यासाठी ग्राहकांना कसलेही पैसे भरावे लागणार नाहीत. देशात अशी एक ट्रेन आहे जी मोफत प्रवास देते.
ही ट्रेन भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळाद्वारे चालवली जाते आणि पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या सीमेवर भाक्रा आणि नांगल दरम्यानच्या विशिष्ट मार्गावर धावते.
TTE शिवाय ट्रेन
भाक्रा-नांगल धरण हे एक लोकप्रिय पर्यटक आकर्षण आहे. जे जगातील सर्वात उंच थेट गुरुत्वाकर्षण धरण म्हणून ओळखले जाते. ही रेल्वे याच मार्गावरून धावते. हे धारण पाहण्यासाठी अनेक पर्यटक खूप लांबून येत असतात.
धारण पाहण्यासाठी आलेले पर्यटक तिथे रेल्वेने मोफत प्रवास करू शकतात. ट्रेन शिवालिक टेकड्या आणि सतलज नदीतून 13 किलोमीटरचे अंतर कापते. ही ट्रेन लाकडी डब्यांपासून बनलेली असून तिला टीटीई नाही.
आता होणार हे बदल
जेव्हा ही रेल्वे सुरु करण्यात आली तेव्हा १० डबे हते मात्र आता फक्त ३ डबे ठेवण्यात आले आहेत. या रेल्वेचे इंजिन वाफेवर चालायचे मात्र आता डिझेलवर चालत आहे. ट्रेन तिच्या मार्गावरील अनेक स्टेशन आणि तीन बोगद्यांमधून जाते. यामधून सुमारे ८०० लोक प्रवास करतात.
उत्पन्न नाही, तर वारसा महत्वाचा
2011 मध्ये आर्थिक नुकसानीमुळे मोफत सेवा बंद करण्याचा विचार केला, परंतु शेवटी परंपरा पुढे चालू ठेवण्याचा आणि उत्पन्नाचा स्रोत न मानता ट्रेनला वारसा म्हणून पाहण्याचा निर्णय घेतला.
भाक्रा-नांगल धरणाचे बांधकाम 1948 मध्ये सुरू झाले आणि कामगार आणि यंत्रसामग्री या ठिकाणी नेण्यासाठी गाड्यांचा वापर करण्यात आला. धरण अधिकृतपणे 1963 मध्ये उघडण्यात आले आणि तेव्हापासून, पर्यटक त्यांच्या भेटीचा एक भाग म्हणून विनामूल्य रेल्वे प्रवासाचा आनंद घेत आहेत.