PPF News : भारताचा नवीन वर्षाचा अर्थसंकल्प लवकरच जाहीर केला जाणार आहे. यामध्ये केंद्रीय कर्मचारी आणि PPF धारकांसाठी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. PPF मध्ये गुतंवणूकीची मर्यादा वाढवली जाण्याची मागणी केली जात आहे.
नोकरदार आणि सामान्य वर्गासाठी PPF मधील गुंतवणूक एक चांगला पर्याय मानला जात आहे. यामधील तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि चांगला फायदा देखील होईल.
सध्या PPF मध्ये गुंतवणूक करण्याची मर्यादा १.५ लाख आहे. तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे हीच मर्यादा ३ लाखापर्यंत वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे.
PPF मध्ये गुंतवणूक करून तुम्ही दीड कोटीचा निधी कसा मिळवू शकता याबद्दल जाणून घेऊया,
याप्रमाणे दीड कोटींचा निधी निर्माण केला जाणार आहे
एका वर्षात PPF खात्यात जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही पीपीएफमध्ये दरमहा १२,५०० रुपये गुंतवता. 15 वर्षांच्या मुदतीनंतर, तुम्ही तुमचे पीपीएफ खाते 5-5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये वाढवू शकता.
अशा परिस्थितीत, 30 वर्षांनंतर, तुमच्या PPF खात्याचा संपूर्ण निधी 1.5 कोटी (1,54,50,911) पेक्षा जास्त असेल. यामध्ये तुमची गुंतवणूक 45 लाख रुपये असेल आणि व्याजातून मिळणारे उत्पन्न सुमारे 1.09 कोटी रुपये असेल.
25 व्या वर्षी गुंतवणूक करण्यास सुरुवात करावी
जर तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. समजा तुमचे वय 25 वर्षे आहे आणि तुम्ही पीपीएफमध्ये वार्षिक 1.5 लाख गुंतवले, तर तुम्ही वयाच्या 55 व्या वर्षी म्हणजे निवृत्तीच्या सुमारे 5 वर्षे आधी करोडपती होऊ शकता.
जास्त व्याज मिळविण्याचा मार्ग
पीपीएफवरील व्याजाची गणना दर महिन्याच्या 1 ते 5 तारखेपर्यंत केली जाते. ही गणना खात्यातील रकमेवर केली जाते. तुम्ही पीपीएफ खात्यात कोणत्याही महिन्याच्या 5 तारखेपर्यंत पैसे जमा केल्यास, त्याच महिन्यात त्या पैशांवर व्याज मिळेल, परंतु तुम्ही 5 तारखेनंतर किंवा 6 व्या दिवसानंतर पैसे जमा केल्यास, पुढील जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळेल.