भारत

Ration Card News : रेशनकार्डधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय, आता मिळणार 300 रुपये; जाणून घ्या सविस्तर

Ration Card News : देशात लाखो नागरिक रेशन कार्डवरील मोफत धान्याचा लाभ घेत आहेत. तसेच केंद्र आणि राज्य सरकारकडून शिधापत्रिकेच्या नियमांमध्ये अनेक बदल केले जात आहेत. आता मोफत रेशनची मुदत २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

सरकारकडून आता शिधापत्रिका धारकांसाठी एक नवीन उपडेट आणले आहे. यामध्ये सरकारकडून आता रेशनकार्ड धारकांना ३०० रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांकडे शिधापत्रिका आहे त्यांना याचा फायदा होणार आहे.

हरियाणामध्ये बीपीएल आणि एएवाय शिधापत्रिका बनवली आहे त्यांना हरियाणा सरकारकडून मोठी भेट दिली जाणार आहे. या योजनेत सरकारकडून तेल घेण्यासाठी २५० रुपये दिले जायचे आता तीच रक्कम वाढवून ३०० रुपये करण्यात आली आहे.

शिधापत्रिका धारकांच्या फायद्यासाठी सरकारने या योजनेतील रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता सरकार 250 रुपयांची रक्कम वाढविण्याचा विचार करत आहे. यापूर्वी सरकारने ५० लाख रुपये देण्याची घोषणा केली होती.

आता हरियाणा सरकारकडून ही रक्कम वाढवून 300 रुपये करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या बदलाचा लाभ बीपीएल आणि एएवाय शिधापत्रिका असलेल्या ३२ लाख कुटुंबांना मिळणार आहे. या लोकांना सरकारकडून दरमहा 300 रुपये दिले जातील.

सरकारकडून राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्याचा लाखो लाभार्थ्यांना फायदा होतो. सरकारने 250 रुपये जाहीर केल्यापासून लाभार्थ्यांना तेल मिळत नसल्याचा दावाही केला जात आहे.

अशा परिस्थितीत सरकारकडे लाखो लिटर तेलाचा साठा शिल्लक आहे. मार्चमध्ये या तेलाची एक्सपायरी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे तेल शिधापत्रिकाधारकांमध्ये वितरित करण्याचे आदेश शासनाने जिल्हा अन्न व पुरवठा विभागाला जारी केले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts