Nashik Graduate Constituency : राज्यातील पाच जागांच्या पदवीधर निवडणुक निकाल आज जाहीर होत आहे. यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या २ जागा विजयी झाल्या आहेत. तर भाजपने एका ठिकाणी विजयी मिळवला आहे. मात्र सर्व राज्याचे नाशिकच्या जागेवर लक्ष लागले आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात जोरदार लढत होणार आहे. या जागेसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. अपक्ष उभे असलेले आणि भाजपने दिलेला पाठिंबा सत्यजित तांबे हे सध्या आघाडीवर आहेत.
तर महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील या पिछाडीवर आहेत. नाशिक पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीकडे राज्याचे लक्ष लागले असून या निवडणुकीत सत्यजित तांबे विजयी होतात की शुभांगी पाटील विजयी होतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अडीच वाजता नाशिक च्या जागेवर मतमोजणी सुरु झाली आहे. मात्र अद्याप निकाल स्पष्ट झालेला नाही. सत्यजित तांबे यांचा अकरावा नंबर असून शुभांगी पाटील यांचा अनुक्रमांक हा चौदावा आहे.
दरम्यान दोन्ही ठिकाणी मतपत्रिका मोठ्या प्रमाणावर पडत असून तर 28 टेबलांपैकी 17 वा नंबर आहे. तो अवैध म्हणजेच बाद मतांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
नाशिकच्या जागेसाठी एकूण १६ उमेदवारांनी अर्ज भरला आहे. मात्र या जागेसाठी २ उमेदवारांमध्ये चुरशीची लढत मानली जात आहे. पहिल्या मतमोजणीच्या फेरीत सर्वाधिक अवैध मतांचे प्रमाण जास्त आहे.
एक फेरी पूर्ण होण्यासाठी जवळपास १ ते दीड तास लागत आहे. त्यामुळे संध्याकाळी उशीरपर्यंत मतमोजणी सुरु राहण्याची शक्यता आहे. नाशिक निवडणूक जागेचा निकाल रात्री उशिरा घोषित केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे यांच्यामध्ये अटीतटीची लढत होत आहे. सध्यातरी सत्यजित तांबे आघाडीवर आहेत. मात्र अजूनतरी चित्र स्पष्ट नाही. अवैध मतांची संख्या जास्त असल्याने चित्र स्पष्ट होईल वेळ लागत आहे.