IMD Alert : देशात आता हळूहळू थंडी कमी होत चालली आहे. तसेच लवकरच उन्हाळा सुरु होणार आहे. मात्र त्यापूर्वी भारतीय हवामान खात्याकडून १० राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
हवामानात बदल होत असल्याने तापमानात बदल होत आहे. कधी तापमानात वाढ होत आहे तर कधी घट होत आहे. देशातील काही राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
राजधानी दिल्लीत फेब्रुवारीमध्ये एकही दिवस पाऊस पडला नाही, परंतु पुढील दोन दिवस 19 आणि 20 फेब्रुवारीला ढगाळ वातावरण राहील. याशिवाय तापमानाबद्दल बोलायचे झाले तर आज म्हणजेच 18 फेब्रुवारीला किमान तापमान 13 आणि कमाल तापमान 30 अंश नोंदवले गेले. त्याचबरोबर येत्या काही दिवसांत हलके धुकेही पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तर अरबी समुद्राच्या प्रदेशात अँटीसायक्लोनिक प्रणाली विकसित झाल्यामुळे तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे. यासोबतच राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा चढला आहे.
जयपूरसह विविध शहरांतील पुढील एक आठवड्यातील हवामानाची स्थिती पाहिली तर ते कोरडे राहील. मात्र, वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान दिसून येईल. त्यामुळे तापमानातही घट दिसून येईल.
या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार
गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, लडाख आणि जम्मू-काश्मीरच्या वरच्या भागात तसेच अरुणाचल प्रदेशसह तीन राज्यांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. सिक्कीम, आसाम, अंदमान आणि निकोबार बेटांवर पावसाची शक्यता आहे.
सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसह लेह लडाख, जम्मू काश्मीर आणि पर्वतीय राज्यात हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्वेकडील राज्यात पाऊस सुरूच राहणार आहे.
आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, नागालँडसह पूर्वेकडील राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर, वायव्य, मध्य आणि पूर्व भारतातील बहुतांश भागात दिवस आणि रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा जास्त राहू शकते.