भारत

Hero Bike : Hero ने लॉन्च केली जबरदस्त Glamour Xtec बाईक, फक्त 11000 रुपयांमध्ये खरेदी करता येणार…

Hero Bike : हिरो कंपनीच्या बाईक बाजारात सर्वाधिक लोकप्रिय आहेत. कंपनीकडून अनेक नवीन बाईक लॉन्च केल्या जात आहेत. तसेच ग्राहकही नवीन बाईक्सला प्रचंड प्रतिसाद देत आहेत. आता कंपनीकडून नवीन Glamour Xtec बाईक लॉन्च करण्यात आली आहे.

ही बाईक होंडा कंपनीच्या गाड्यांना टक्कर देईल असे कंपनीचे मत आहे. हिरो कंपनीने Glamour Xtec बाईक लॉन्च ऑटो क्षेत्रात दरारा निर्माण केला आहे. कंपनीने अगोदरच गेल्यावर्षी जुलै महिन्यात ग्लॅमरचे नवीन Xtec मॉडेल लॉन्च केले होते.

दिल्लीमध्ये या गाडीची एक्स-शोरूम किंमत 78,900 रुपये आहे. मात्र कंपनीकडून अनेकवेळा या बाईकची किंमत बदलण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा कंपनीने या बाईकची किंमत वाढवली आहे.

इंजिन

कंपनीकडून बाईकचे इंजिन मजबूत देण्यात आले आहे. कंपनीकडून 125 cc सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. जे 7,500 rpm वर 10.7 bhp ची कमाल पॉवर आणि 6,000 rpm वर 10.6 Nm पीक टॉर्क जनरेट करते.

लुक आणि डिझाइन

कंपनीकडून नवीन अपडेटसह जबदस्त लूक आणि डिझाईन या बाईकमध्ये देण्यात आले आहे. Hero Glamour Xtec ला LED हेडलॅम्पसह H आकाराचा पोझिशन लॅम्प मिळतो.

बाईकमध्ये 3D ब्रँडिंग, रिम टेप्स आणि नवीन मॅट कलरसाठी निळ्या अॅक्सेंटचा समावेश आहे. बाइकला टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि प्रीलोड-अ‍ॅडजस्टेबल रिअर मोनो-शॉक मिळतात.

EMI योजना

ही बाईक तुम्हाला खरेदी करायची असेल तर फायनान्स देखील करू शकता. कमी व्याजदरात तुम्हाला अनेक फायनान्स कंपन्या उपलब्ध आहेत. यामधील एका कंपनीचे फायनान्स निवडून कमी पैशात बाईक घरी आणू शकता.

ऑनलाइन डाउन पेमेंट आणि ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, जेव्हा तुम्ही फायनान्स प्लॅनद्वारे ते खरेदी करण्यासाठी कर्जासाठी अर्ज करता, तेव्हा बँक त्यासाठी 9.7 टक्के वार्षिक व्याजदरासह 94,828 रुपये कर्ज देईल.

जर तुम्ही बाईक खरेदीसाठी ११ हजार डाउन पेमेंट केले तर तुम्हाला पुढील 3 वर्षांसाठी दरमहा 3,046 रुपये मासिक EMI भरावे लागेल. यावर तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज मिळून जाईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Hero Bike

Recent Posts