Hero Splendor Plus EV : देशात सध्या अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहने निर्मिती करण्याकडे भर देत आहेत. तसेच अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने भारतीय बाजारपेठेत दाखल केली आहेत. त्यामुळे ग्राहकांना इंधनावरील पैशांचा भार कमी झाला आहे.
भारतीय ऑटो मार्केटमध्ये हिरो कंपनीची स्प्लेंडर बाईक सर्वाधिक लोकप्रिय आहे. तसेच दरवर्षीं सर्वाधिक खप होणारी बाईक देखील हिरोची स्प्लेंडर बाईक आहे. तसेच कमी किमतीत जास्त मायलेज देणारी बाईक असल्याने ग्राहकही या बाईक चांगला प्रतिसाद देत आहेत.
आता कंपनीकडून हिरो स्प्लेंडर प्लस बाईकमध्ये नुकताच बदल केला आहे. तसेच या बाईकची किंमत ९० हजार ठेवण्यात आली आहे. ही बाईक आता Hero Splendor plus XTEC या नावाने सादर करण्यात आली आहे.
या बाईकमध्ये कंपनीकडून अनेक नवीन आणि धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह इतर नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. या नवीन बाईकमध्ये 97.2cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे.
हिरो स्प्लेंडर प्लस इलेक्ट्रिक बनवा
दिवसेंदिवस इंधनाच्या किमती अधिक वाढत असल्याने वाहनधारकांना जास्तीचा आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता अनेकजण इलेक्ट्रिक बाईक, कार किंवा स्कूटरचा पर्याय निवडत आहे.
तुम्हालाही तुमची हिरो स्प्लेंडर बाईक इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये बनवायची असेल तर तुम्ही सहज ही बाईक इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला जास्त खर्च येणार नाही. स्मार्टफोनच्या किमतीमध्ये तुम्ही तुमची स्प्लेंडर बाईक इलेक्ट्रिक रूपात बनवू शकता.
हिरो स्प्लेंडरला इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये बनवण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च येणार नाही. तसेच एकदा इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये बाईक बनवल्यास तुम्हाला पुन्हा पेट्रोल भरावे लागणार नाही. तुम्ही तुमच्या स्प्लेंडर बाईकमध्ये इलेक्ट्रिक किट बसवून बाईक इलेक्ट्रिक बनवू शकता. यासाठी तुम्हाला आरटीओकडून मंजुरी घ्यावी लागेल.
एक किट पेट्रोलवरील पैसे वाचवेल
हिरो स्प्लेंडर बाईक इलेक्ट्रिक बनवण्यासाठी जे किट लागत आहे ते महाराष्ट्रातील ठाण्यामध्ये बनवण्यात आले आहे. जे तुमच्या स्प्लेंडर बाईकला पॉवरफुल बनवते. या किटची किंमत 35,000 रुपयांपेक्षा जास्त आहे ज्यावर 6000 रुपयांपेक्षा जास्त जीएसटी लावला जाऊ शकतो.
तुम्ही स्प्लेंडर बाईकला इलेक्ट्रिक बनवण्यासाठी जे किट वापरत आहेत त्यावर ३ वर्षांची वॉरंटी देण्यात येत आहे. जे किट सिंगल चार्जवर स्प्लेंडर बाईक १५१ किमी धावण्यासाठी मदत करेल. जर तुम्हाला इलेक्ट्रिक किट बसवलेली स्प्लेंडर बाईक हवी असेल तर तुम्हाला ती 1.45 लाख रुपयांना विकत घ्यावी लागेल.