Himachal Pradesh Tourism : सध्या उन्हाळ्याचे दिवस होत आहेत. त्यामुळे या दिवसांमध्ये अनेकांना सुट्ट्या असतात. तसेच शाळांना सुट्ट्या असल्याने अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. पण अनेकदा फिरायला कुठे जायचे हा प्रश्न पडत असतो. भारतात अशी काही ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी तुम्ही बिनधास्त फिरायला जाऊ शकता.
जर तुम्हीही या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी हिमाचल प्रदेश हे राज्य सहलीसाठी योग्य आहे. कारण या ठिकाणी अशी अनेक सुंदर आणि मनमोहक ठिकाणे आहेत जी फिरल्यानंतर तुमची पैसे वसूल सहल होईल.
हिमाचलमधील सोसन ला तुम्ही या सुट्ट्यांमध्ये भेट देऊ शकता. या ठिकाणी अशी अनेक मनमोहक स्थळे आणि सुंदर दृश्य पाहायला मिळतील. या ठिकाणच्या हिल स्टेशनचा आनंद तुम्ही या सुट्ट्यांमध्ये घेऊ शकता.
ट्रेकिंच्या दृष्टिकोनातून हे ठिकाण अत्यंत प्रसिद्ध आहे. तसेच त्याच्या आजूबाजूलाही अनेक ठिकाणे आहेत ज्यांना तुम्हीसहजपणे भेट देऊन तुम्ही सहलीचा आनंद घेऊ शकता.
पार्वती व्हॅली
सोसन पासून काही आंतरवर हे ठिकाण एक प्रसिद्ध ठीकण आहे ज्याला तुम्ही भेट देऊ शकता. हे ठिकाण ट्रेकिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. या ट्रेक दरम्यान तुम्ही ओढे, तलाव, धुरकट पर्वत शिखरे, छोटी गावे, विस्तीर्ण खोऱ्यातील मैदाने तसेच वाघांची जंगले आणि किल्ले यासाठी खूप प्रसिद्ध आहे.
तसेच ट्रेकिंग व्यतिरिक्त राफ्टिंग, कॅम्पिंग, पार्क ट्रेकिंग सारख्या अनेक सुविधा आहेत. जेव्हा उत्तर भारतामध्ये उन्हाळा सुरु असतो तेव्हा या ठिकाणी तापमान खूपच कमी असते. त्यामुळे या ठिकाणाला भेट देऊन तुम्ही सहलीचा आनंद घेऊ शकता.
खीर गंगा
पार्वती नदीच्या काठावर वसलेले हे एक सुंदर छोटेसे गाव आहे. ट्रेकिंग व्यतिरिक्त, इतर अनेक मनमोहक दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतील. या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य तुमच्या हृदयाला स्पर्श करेल.
खीर गंगेतील गरम पाण्याचा तलाव आणि भगवान कार्तिकेयची गुहा हे दोन्ही ठिकाणे प्रमुख आकर्षण आहेत. जर तुम्ही या गरम पाण्याच्या कुंडामध्ये अंघोळ केली तर तुमची अनेक आजारापासून सुटका होईल असे मानतात. खीर गंगामधील तलाव, धबधबे, नैसर्गिक वातावरण आणि वनस्पती आणि प्राणी यांचा आनंद घेऊ शकता.
परळी
हिमाचल प्रदेशमधील परळी हे एक लहान शहर आहे. शार जरी लहान असले तरी येथील नैसर्गिक सौंदर्य खूपच मनमोहक आहे. या ठिकाणी लाखो पर्यटक दरवर्षी भेट देतात. उंच टेकड्या, घनदाट जंगले आणि विलोभनीय दृश्ये या ठिकाणी प्रसिद्ध आहेत.