Honda Bike : जपानी दुचाकी निर्मिती कंपनी होंडाच्या अनेक बाईक आणि स्कूटर भारतीय बाजारात अधिक लोकप्रिय आहेत. तसेच कंपनीकडून अनेक नवनवीन बाईक लॉन्च केल्या जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना अधिकाधिक बाईक खरेदी करण्याचा पर्याय मिळत आहे.
भारतीय टू-व्हीलर मार्केटमधील 125cc इंजिन सेगमेंटमध्ये तुम्हाला अनेक उत्तम बाइक्स मिळतील. होंडा कंपनीने देखील Honda SP 125 ही बाईक भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. या बाईकवर भन्नाट ऑफर दिली जात आहे.
Honda SP 125 या बाईकमध्ये दमदार इंजिन आणि स्टायलिश लूकसह मायलेज देखील सर्वोत्तम देण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी पैशामध्ये अधिकाधिक मायलेज देणारी बाईक मिळत आहे.
किंमत
Honda SP 125 या बाईकची भारतीय बाजारात 88,204 रुपये एक्स शोरूम किंमत ठेवण्यात आली आहे. तसेच बाईकची ऑन रोड किंमत 1,01,796 रुपयांपर्यंत जाते. जर तुमचे इतके बजेट नसेल तर तुम्ही कमी बजेटमध्ये देखील ही बाईक खरेदी करू शकता.
तुमच्याकडे Honda SP 125 बाईक खरेदी करण्यासाठी १ लाख रुपये नसतील तर तुम्ही फक्त २० हजार रुपयांच्या डाउनपेमेंटवर बाईक खरेदी करू शकता. या बाईकवर फायनान्स देखील उपलब्ध आहे.
Honda SP125 बाईकची फायनान्स योजना
जर तुम्हाला फायनान्स वर ही बाईक खरेदी करायची असेल तर तुम्हाला बँकेकडून 86,796 रुपयांचे कर्ज दिले जाईल. हे कर्ज तुम्हाला ३ वर्षासाठी दिले जाते. या ३ वर्षांमध्ये तुम्हाला दरमहा 2,788 रुपये भरावे लागतील. यासाठी बँक तुमच्याकडून वार्षिक 9.7 टक्के व्याजदर आकारेल.
इंजिन
Honda SP125 बाईकमध्ये मजबूत इंजिन देण्यात आले आहे. या बाईकमध्ये 123.94 cc इंजिन बसवण्यात आले आहे. जे 10.8 PS कमाल पॉवर तसेच 10.9 Nm चा पीक टॉर्क बनविण्यास सक्षम आहे. या बाईकमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
ही बाईक 65 किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज देईल. या बाईकमध्ये उत्तम ब्रेकिंगसाठी, कंपनीने समोर डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक दिले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही एक जबरदस्त बाईक आहे.