Dawood Ibrahim News : गेल्या दोन दिवसांपासून दाऊदवर विष प्रयोग झाला असल्याची बातमी वाऱ्याचे वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मीडियामध्ये तर कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यावर विष प्रयोग झाल्यानंतर कराची येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला असेही सांगितले जात आहे.
मात्र, याबाबत पाकिस्तान सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण पाकिस्तान मधील काही ज्येष्ठ पत्रकारांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पाकिस्तानात सध्या इंटरनेट बंद करण्यात आले असून युट्युब ट्विटर यांसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म देखील बंद आहेत.
यामुळे पाकिस्तानात काहीतरी विपरीत घडलं आहे अशी आशंका व्यक्त केली जात असून दाऊद कदाचित मरण पावला असावा असा दावा सध्या सोशल मीडियामध्ये केला जात आहे. दरम्यान अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा खरा सूत्रधार होता. तेव्हापासून मुंबई पोलिसांच्या तो रडारवर आला आहे.
दाऊद इब्राहिम पाकिस्तानात बसूनच त्याचे काळे धंदे चालवतो. मात्र पाकिस्तान सरकार तो पाकिस्तानात नसल्याचा दावा करते. पण आता तो पाकिस्तानमध्ये असल्याचे जग जाहीर झाले आहे. दरम्यान, दाऊद इब्राहिम आता मरणाच्या दारावर आला आहे. पण तुम्हाला मुंबई बॉम्ब ब्लास्टचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम मुंबई पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कसा दुबईला फरार झाला होता हे माहिती आहे का ?
कदाचित तुम्हाला याबाबत माहिती नसेल. म्हणून आज आपण दाऊद इब्राहिम मुंबई पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कसा फरार झाला आणि तो मुंबईहून पाकिस्तानात कसा गेला याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे तर मुंबईमध्ये साखळी बॉम्ब ब्लास्ट झाले आणि राजधानीसहित संपूर्ण देशात गोंधळ माजला होता.
देशाच्या आर्थिक राजधानी वर आतंकी हल्ला झाला म्हणून शासन सहित पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. यामुळे या बॉम्बस्फोटांमागील लपलेले चेहरे शोधण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. कर्तव्यदक्ष मुंबई पोलीस राजधानीच्या कानाकोपऱ्यात बॉम्बस्फोटमागे ज्या अतिरेक्यांचा हात होता त्यांना शोधण्यासाठी शोध मोहीम राबवत होते.
दरम्यान पोलिसांनी प्रारंभिक तपास पूर्ण केल्यानंतर या कृत्यामागे दाऊद इब्राहिम आणि त्याचे साथीदार असल्याची बातमी त्यांना मिळाली. मग काय पोलिसांनी दाऊदला पकडण्यासाठी प्लॅन आखला. दाऊदला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांनी त्याच्या कार्यालयावर रेड टाकण्याचा निर्णय घेतला. पण पोलीस जेव्हा दाऊदच्या कार्यालयात पोहोचले तेव्हा त्यांना समजले की तो काही वेळापूर्वी तिथून निघून गेला होता.
दाऊद इब्राहिमला जेव्हा पहिल्यांदा अटक करण्यात आली तेव्हा त्याचा पासपोर्टही जप्त करण्यात आला होता. त्यामुळे दाऊद इब्राहिम पासपोर्टशिवाय परदेशात जाऊच शकत नाही अशा मोठ्या गैरसमजुतीत पोलीस होते. मात्र ही पोलिसांची पहिली आणि मोठी चूक होती. कारण की तो पासपोर्ट पोलिसांकडे जमा असताना ही दुबईला फरार झाला होता.
दुबईला गेल्यानंतर तो तेथून पाकिस्तानात पोहोचला असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे. दाऊद इब्राहिमचे पोलिस खात्यातही गुप्तहेर होते, आणि त्यांनीच पोलिसांच्या या कारवाईबाबत दाऊदला आधीच माहिती दिली असल्याची कबुली देखील काही वरिष्ठ पोलिसांनी दिली. काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये दाऊदला दुबईहुन पाकिस्तानात जाण्यासाठी आयएसआयने मदत केल्याचे सांगितले गेले आहे.