EPFO News : नोकरी करत असताना त्यातील काही टक्के रक्कम भविष्य निर्वाह निधी म्हणून कापला जातो. यासोबतच कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन देखील दिली जाते. या योजनेअंतर्गत 75 लाख पेन्शनधारक लाभार्थी आहेत.
तुम्हीही ईपीएफओचे कर्मचारी असाल तर तुम्हालाही निवृत्तीनंतर पेन्शन दिली जाईल. मात्र जर पेन्शन धारकाचा मृत्यू झाला तर पेन्शनचा लाभ मिळणार का? जर पेन्शन मिळाली तर ती कोणाला मिळणार? जाणून घेऊया सर्व प्रश्नांची उत्तरे..
जर पेन्शनधारकाचा मृत्यू झाला तर ती पेन्शन कुटुंबातील सदस्यांना मिळते. तसेच ही पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हाला काही कागदपत्रे ईपीएफओकडे जमा करावी लागतील. तेव्हाच तुम्ही पेन्शन घेण्यास पात्र ठरू शकता.
कोणती कागदपत्रे जमा करावी लागतील
पेन्शनधारकांचे मृत्यू प्रमाणपत्र
लाभार्थ्यांच्या आधारची प्रत
लाभार्थ्यांचे बँक खाते तपशील
बँकेच्या पासबुकची साक्षांकित प्रत आणि मूळ रद्द केलेला चेक
मुले असल्यास वयाचा पुरावा
EPS-95 साठी कोण पात्र आहे?
भविष्य निर्वाह निधीमध्ये ज्या कर्मचाऱ्याचे पैसे कापले जात आहेत तो सदस्य पेन्शनचा लाभ घेऊ शकतो. EPFO कडून यासाठी पगारातून काही ठराविक रक्कम कापली जाते.
यापैकी ८.३३ टक्के रक्कम पेन्शन हेडमध्ये जाते. तसेच, EPS 95 पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन मिळविण्यासाठी कर्मचाऱ्याला किमान 10 वर्षे सेवा पूर्ण करावी लागेल. या योजनेअंतर्गत सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षे आहे. EPF सदस्य 50 वर्षांच्या वयापासून कमी दराने त्याचे EPS काढू शकतात.