Hyundai Exter Car : भारतीय ऑटो मार्केटमध्ये Hyundai Motors च्या अनेक कार अधिक लोकप्रिय आहेत. तसेच Hyundai Motorsच्या अनेक कारची विक्री देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. Hyundai Motors कारला ग्राहकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आता Hyundai Motors कडून नवीन आणखी एक जबरदस्त कार लॉन्च केली जाणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांना आणखी एक नवीन कार खरेदी करण्याचा पर्याय मिळत आहे. या कारचे नाव Ai3 असेल.
Hyundai Motors कडून SUV सेगमेंटमध्ये ही कार लॉन्च केली जाणार आहे. ही कंपनीची मायक्रो एसयूव्ही असेल जी बर्याच काळापासून चर्चेत आहे. Hyundai Motors Ai3 ही कार टाटा पंच कारला टक्कर देईल असा दावा करण्यात येत आहे.
Hyundai Ai3 कंपनीकडून या नवीन SUV कारमध्ये अनके धमाकेदार वैशिष्ट्ये देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे ग्राहकांना आता Hyundai ची पूर्णपणे सुसज्ज फीचर्स असलेली SUV कार खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
इंजिन
Hyundai Exter मध्ये 1.2 लीटर 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. हे 1.2 लीटर इंजिन 83 PS पॉवर आणि 113.8 Nm टॉर्क जनरेट करू शकते. यासोबतच यामध्ये 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते.
तसेच या कारमध्ये सीएनजीचा पर्यायही दिला जाऊ शकतो. हे 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक पर्यायासह ऑफर केले जात आहे. यासोबतच AWD ड्राइव्ह प्रकारची यंत्रणा मिळण्याची शक्यता आहे.
किंमत काय असू शकते?
Hyundai कंपनीकडून नवीन Ai3 कारची किंमत ग्राहकांसाठी खूपच कमी ठेवली जाऊ शकते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक देखील ही कार खरेदी करू शकतात. Hyundai कंपनीकडून Ai3 या कारची किंमत बेस मॉडेल ६ लाख ते टॉप मॉडेल १२ लाखांपर्यंत असू शकते.
Hyundai कंपनीकडून Ai3 ही कार २०२३ च्या अखेरीस लॉन्च केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अद्याप कंपनीकडून या कारबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.