भारत

Jungle Trekking Place: तुम्हाला देखील ट्रेकिंगसारखी ऍडवेंचर ऍक्टिव्हिटीज आवडते का? तर भारतातील या ठिकाणांना भेट द्या!

Jungle Trekking Place:- बऱ्याच जणांना साहशी पर्यटनाची हौस असते. तसेच पर्यटनामध्ये बऱ्याच जणांना काहीतरी एडवेंचर ऍक्टिव्हिटी करायला खूप मोठ्या प्रमाणावर आवड असते. असे पर्यटक नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जंगलांमध्ये जातात व त्या ठिकाणी  ट्रेकिंग सारख्या ऍक्टिव्हिटीची मौज लूटतात.

यासोबतच एखादा गड किल्ला सर करणे हे देखील एक साहसी पर्यटनाचेच उदाहरण आहे. यामध्ये जंगल सफारीला देखील खूप महत्व असते. जर आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये अनेक जंगले तर आहेतच परंतु उंचच उंच गड किल्ल्यांचा देखील यामध्ये समावेश आहे.

तसे पाहायला गेले तर किल्ल्यांवर किंवा मोठ्या पर्वतावर ट्रेकिंग मोठ्या प्रमाणावर केली जाते व या प्रकारची ट्रेकिंग करायला फार मोठे धाडस लागत असते. परंतु या व्यतिरिक्त तुम्हाला जंगलात देखील ट्रेकिंग करता येते. जंगल ट्रेकिंगचे आवड देखील बऱ्याच जणांना असते.

त्यामुळे तुम्हाला देखील जर जंगलात ट्रेकिंग करायची इच्छा असेल तर तुम्ही भारतामधील काही महत्वाच्या ठिकाणांना भेट देऊ शकतात व त्या ठिकाणी ट्रेकिंगची मजा लुटू शकतात. त्यामुळे या लेखांमध्ये आपण भारतातील काही महत्त्वाचे ठिकाणी बघणार आहोत त्यांची जंगल ट्रॅकिंग साठी खूप फायद्याची ठरतील.

 ही आहेत भारतातील जंगल ट्रेकिंग साठी महत्त्वाची ठिकाणे

1- कुंजखरक ट्रेक हिमालय पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या कॉर्बेट जवळील पंगोटपासून हा कुंजखरक ट्रेक सुरू होतो हे जंगल ट्रेकिंग साठी खूप महत्त्वाचे असे ठिकाण आहे व ते उत्तराखंड राज्यामध्ये आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आरामदायी आणि निवांत वेळ घालवता यावा यासाठी जंगल ट्रेकिंग करिता हा एक महत्त्वाचा व उत्तम पर्याय आहे.

जर तुम्ही या ठिकाणी ट्रेकिंग कराल तर उंच पाईन वृक्ष तुम्हाला नजरेस पडतील व त्यासोबतच तुम्हाला कोसी नदीचे देखील दर्शन होईल. ही नदी पार करून तुम्हाला पलीकडे जाणे गरजेचे राहील

व भारतातील जंगल ट्रेकिंगसाठी हे ठिकाण तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरेल. तुम्हाला देखील या ठिकाणी भेट द्यायची इच्छाअसेल तर ऑक्टोबर ते एप्रिल हा कालावधी यासाठी खूप उत्तम मानला जातो.

2- कान्हा नॅशनल पार्क कान्हा  नॅशनल पार्क हे भारताचे सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान असून जंगल ट्रेकिंगकरिता हा एक चांगला पर्याय आहे. या नॅशनल पार्कमध्ये तुम्हाला सस्तन प्राण्यांच्या 22 प्रजाती आढळून येतात. भारतामध्ये जंगल ट्रेकिंगसाठी जी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत

त्यापैकी कान्हा नॅशनल पार्क हे एक महत्त्वाचे स्थान म्हणून ओळखले जाते. तुम्हाला जर या ठिकाणी घनदाट जंगलातून ट्रेकिंग करायची असेल तर दोन ते तीन तासाचा कालावधी लागतो. या ठिकाणीजर तुम्हाला जायचे असेल तर ऑक्टोबर ते जून महिन्याच्या अखेरचा कालावधी उत्तम ठरतो.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts